२०२५ वर्ष सुरू झाल्यापासून अनेक नव्या सिनेमांच्या घोषणा होत असून आगामी अनेक सिनेमांचे ट्रेलर प्रदर्शित होत आहे. यात अ‍ॅक्शन, आणि थ्रिलर सिनेमांचा सुद्धा समावेश आहे. हे सर्व सिनेमे यायला अजून बऱ्यापैकी वेळ असला तरी तुम्ही अ‍ॅक्शन सिनेमांचे चाहते असल्यास प्राईम व्हिडीओवर उपलब्ध अनेक अ‍ॅक्शन सिनेमांचा आनंद तुम्हाला घेता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राईम व्हिडीओवर विविध प्रकारच्या उत्तम अ‍ॅक्शन चित्रपटांचा संग्रह आहे. नैसर्गिक आपत्तीवर आधारित थरारपटांपासून ते जबरदस्त क्राईम ड्रामा चित्रपटांपर्यंत, येथे अनेक अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमे उपलब्ध आहे. आम्ही आज तुम्हाला या प्राईम व्हिडीओवर सर्वोत्तम सहा अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमे उपलब्ध आहेत.

हेही वाचा…Baby John Ott Release : वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ ओटीटीवर पाहता येणार, कुठे आणि कधी? जाणून घ्या

द वेव्ह (२०१५)

The Wave On Prime Video : तुम्ही थरारक चित्रपटांचे चाहते असाल, तर ‘द वेव्ह’ नक्की पाहावा. एका छोट्या नॉर्वजियन गावात घडणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर आधारित हा चित्रपट आहे. हिमस्खलनामुळे ८० मीटर उंच लाट तयार होते आणि त्यानंतरची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते. अप्रतिम दृश्ये आणि उत्कंठावर्धक कथा यामुळे हा २०१० च्या दशकातील आपत्तीवर आधारित एक उत्तम चित्रपट आहे.

द थॉमस क्राउन अफेअर (१९९९)

The Thomas Crown Affair On Prime Video : १९६८ च्या ‘क्लासिक’ चित्रपटाचा हा रीमेक आहे. पिअर्स ब्रॉसनन यांनी थॉमस क्राउन या कलेच्या (आर्ट) गोष्टी चोरणाऱ्या चोराच्या अप्रतिम अभिनय केला आहे. क्राउन आणि इन्शुरन्स तपासक कॅथरीन (रेने रूसो) यांच्यातील खेळीमेळीची संघर्षकथा चित्रपट अधिक रंगतदार बनवते. चोरीची (हाईस्ट) कथा आवडणाऱ्यांसाठी हा चित्रपट एक पर्वणी आहे.

हेही वाचा…या आठवड्यात OTT वर रिलीज होणाऱ्या कलाकृतींची यादी, वाचा…

स्टेजकोच (१९३९)

Stagecoach On Prime Video : विविध प्रवासी लोकांच्या एका प्रवासाची ही कथा असून ती अपाचे प्रदेशावर आधारित आहे. या चित्रपटाने जॉन वेन यांना प्रेक्षकांसमोर आणले. वेस्टर्न शैलीवर याचा मोठा प्रभाव पडला आहे, त्यामुळे अ‍ॅक्शन चित्रपटांच्या इतिहासात रस असणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा चित्रपट आहे.

सिकारिओ (२०१५)

Sicario On Prime Video : डेनिस व्हिलेन्यूव्ह यांचा ‘सिकारिओ’ हा जबरदस्त थरारपट आहे, जो मेक्सिकन ड्रग कार्टेलविरुद्धच्या अमेरिकी सरकारच्या युद्धाचे तपशीलवार चित्रण करतो. FBI एजंटची भूमिका साकारणारी एमिली ब्लंट आणि तिच्या कामगिरीत प्रभावी ठरलेले बेनिसियो डेल टोरो यांचा अभिनय पाहण्याजोगा आहे.

हेही वाचा…Pataal Lok 2 Trailer: जबरदस्त गूढ, अ‍ॅक्शन आणि ‘ती’ तारीख…, ‘पाताल लोक २’ चा ट्रेलर प्रदर्शित

मंकी मॅन (२०२४)

Monkey Man Prime Video : जॉन विकसारख्या चित्रपटांपासून प्रेरित, ‘मंकी मॅन’ एका योद्ध्याचा बदला घेण्याच्या प्रवासाची कहाणी सांगतो. चित्रपटाला काही कमतरता आहेत, पण अ‍ॅक्शन चित्रपटांचे चाहते याला नक्कीच एन्जॉय करतील.

हेही वाचा…दीड वर्षापासून भात, पोळी, साखर काहीच खाल्लं नाही; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला…

मिशन: इम्पॉसिबल – डेड रेकनिंग, पार्ट वन (२०२३)

Mission: Impossible – Dead Reckoning, Part One : मिशन: इम्पॉसिबल फ्रँचायझीतील नवीन भाग ‘डेड रेकनिंग, पार्ट वन’ Amazon Prime Video वर उपलब्ध आहे. एथन हंट (टॉम क्रूझ) आणि त्याच्या टीमचा हा थरारक प्रवास अप्रतिम अ‍ॅक्शन सीक्वेन्स आणि खिळवून ठेवणाऱ्या कथानकासह तुमचे मनोरंजन करतो.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action thriier movies prime video the wave the thomas crown affair stagecoach the thomas crown affair psg