ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांच्या जादुई आवाजाचे बॉलीवूडमध्ये अनेक चाहते आहेत. बॉलीवूडमध्येही त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘रामायण’ चित्रपटावरून दिग्दर्शक नितेश तिवारी यांना खडेबोल सुनावल्यावर आता अन्नू कपूर यांनी ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह सीरिजविषयी परखड मत मांडले आहे.
हेही वाचा : “घरी गाडी असून ऑडिशनला बसने जायचो, कारण…”, विकी कौशलने केला खुलासा; म्हणाला, “आई-वडिलांनी…”
ओटीटी माध्यमांविषयी ‘इंडिया डॉट कॉमला’ दिलेल्या मुलाखतीत अन्नू कपूर म्हणाले, “ओटीटी हा चित्रपट निर्मितीशी संबंधित सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. या ओटीटीवर कपडे उतरवले की, दर्शकांची संख्या वाढते. हा प्लॅटफॉर्म अजिबात छोटा नाही…अशा सीरिजची निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांकडे पुष्कळ पैसा आहे. मला माहिती नाही हा प्रेक्षकांचा पैसा आहे की, अजून कुठून येतो याबाबत मला खरंच काही कल्पना नाही. पण, मी एवढं नक्की सांगेन की, समाजातील लोकांनी चांगले काय वाईट काय? यातील फरक शिकला पाहिजे.”
हेही वाचा : “हॉलीवूड अमूक, हॉलीवूड तमूक…”, शाहीद कपूरच्या पत्नीचे ‘बार्बी’ चित्रपटाबद्दल वक्तव्य; म्हणाली…
अन्नू कपूर पुढे म्हणाले, “प्रत्येक माणसाच्या हातात असते काय पाहावे आणि काय पाहू नये. ज्या दिवशी तुम्ही निश्चय कराल अशा नग्नता, आक्षेपार्ह सीन्सचा भडीमार असणाऱ्या सीरिज पाहणार नाही. त्यादिवशी ओटीटीचे महत्त्व कमी होईल. या ओटीटीची जराही लायकी नाही.”
हेही वाचा : Video: साक्षी धोनी आहे ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याची चाहती; म्हणाली, “त्याचे हिंदीत डब केलेले चित्रपट…”
“नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या माध्यमांवर नियंत्रण ठेवले नाही तर समाजात अराजकता पसरेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात वाईट गोष्टी कशा प्रसारित करायच्या हे त्यांनाच जास्त माहीत आहे.”, असे मत अन्नू कपूर यांनी मांडले. दरम्यान, लवकरच हे ज्येष्ठ अभिनेते ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.