टीव्ही मालिकांमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या गुरमीत चौधरीने चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम करून करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘रामायण’मधून लोकप्रियता मिळवणाऱ्या गुरमीतने ‘खामोशियां’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नंतर त्याने अनेक वेब सीरिज केल्या. सध्या त्याची सीरिज ‘ये काली काली आंखें 2’ चांगलीच चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एखाद्या अभिनेत्यासाठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी, त्यांची मनं जिंकण्यासाठी आपलं काम चोख करावं लागतं. पण प्रत्येक पात्र वठवणं इतकं सोपं नसतं. काही वेळा अशा भूमिका असतात, ज्या साकारण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अशा कठीण भूमिका साकारण्यासाठी सेलेब्स त्यांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे डाएट प्लॅन फॉलो करतात. आता गुरमीतने ‘ये काली काली आंखें’तील भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल सांगितलं आहे.

हेही वाचा – Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ

भूमिकेसाठी गुरमीत चौधरीने घेतली मेहनत

क्राइम थ्रिलर वेब सीरिज ‘ये काली काली आंखें’ चे आतापर्यंत दोन सीझन आले आहेत. पहिला सीझन २०२२ मध्ये आला होता आणि दुसरा सीझन २०२४ मध्ये प्रदर्शित झाला. दोन्ही सीझन नेटफ्लिक्सवर रिलीज झाले. या सीरिजमध्ये गुरमीतने गुरू नावाचे पात्र साकारले आहे. त्याची भूमिका दमदार असून प्रेक्षकांना भावली आहे. गुरमतीने हे पात्र साकारण्यासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल भारती सिंग व हर्ष लिंबाचियाच्या पॉडकास्टमध्ये माहिती दिली. या भूमिकेसाठी दीड वर्ष एकाच पद्धतीचा आहार घेतला, असं गुरमीतने सांगितलं.

हेही वाचा – Bigg Boss 18 फेम विवियन डिसेनाच्या पहिल्या बायकोने एका महिन्यात सोडली मालिका, ७ वर्षांनी केलेलं पुनरागमन; नेमकं काय घडलं?

गुरमीत चौधरी म्हणाला, “हे खरं तर खूप कठीण आहे. पण मी दीड वर्षापासून साखर, पोळी, भात किंवा ब्रेड खाल्लं नाही. तुम्हाला प्रत्येक भूमिकेसाठी स्वतःला मानसिकरित्या तयार करावं लागतं. मला खायला फार आवडतं, पण मला तेच सोडावं लागतं. मी दीड वर्षे फक्त एकाच पद्धतीचं उकडलेलं अन्न खाल्लं. त्याला चव नसते, पण हळुहळू मला सवय झाली आणि ते चविष्ट वाटू लागलं. आता मी जर काहीही अनहेल्दी खाल्लं, तर मला आवडत नाही.”

गुरमीत म्हणाला, “मी तूप खाऊ शकतो, पण त्याचे प्रमाण जास्त झाले तर तेही माझे शरीर नाकारते.” गुरमीत जेवणाच्या व झोपण्याच्या वेळा कटाक्षाने पाळतो. तो पहाटे चार वाजता उठतो आणि रात्री साडेनऊ वाजता झोपतो, असंही त्याने सांगितलं.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor gurmeet choudhary diet plan says not eaten chapati bread sugar from last 1 and half year hrc