‘बिग बॉस हिंदी’चं पहिलं ओटीटी पर्व सुपरहिट ठरल्यानंतर आता या शोचं दुसरा ओटीटी पर्व सुरू झालं आहे. या पर्वाच्या पहिल्या भागापासून हे पर्व ‘या स्पर्धकांमुळे’ चांगलंच चर्चेत आलं आहे. हे पर्व सुरू झाल्या झाल्या दुसऱ्या दिवसापासूनच या स्पर्धकांमध्ये चांगलीच भांडणं होताना दिसत होती. तर आता या कार्यक्रमातील दोन स्पर्धकांनी एकमेकांना लिपलॉक किस केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘बिग बॉस’चं हे पर्व सुरू झाल्यावर या पर्वातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आतापर्यंत या कार्यक्रमात जोरदार भांडण होताना दिसली. तर आता एका टास्कदरम्यान अभिनेता जैद हदीद आणि अभिनेत्री आकांक्षा पुरी यांनी एकमेकांना बराच वेळ किस केलं. आता त्यांच्या या किसचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

आणखी वाचा : “जगात तुझं एकटीचंच लग्न मोडलेलं नाही…,” पूजा भट्ट व नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीमध्ये खडाजंगी, म्हणाली, “तुझा शहाणपणा…”

या कार्यक्रमामधील स्पर्धक अविनाश सचदेव याने जैद आणि आकांक्षाला एक कठीण आव्हान दिलं. त्याने त्या दोघांना सर्व घरच्या सदस्यांसमोर ३० सेकंद एकमेकांना डीप फ्रेंच किस करण्यास सांगितलं. जैद आणि आकांक्षांने हे चॅलेंज स्वीकारलं. त्या दोघांनी एकमेकांना किस करायला सुरुवात केली. त्या दोघांना किस करताना पाहून घरातील इतर सदस्य आश्चर्यचकित झाले. काही वेळातच सर्व सदस्यांनी त्या दोघांना “आता तुमचं हे चॅलेंज थांबवा” असं सांगितलं. तर यानंतर जैद आणि आकांक्षाने किस करणं थांबवलं.

हेही वाचा : मराठी चित्रपटात झळकलेली ‘ही’ आघाडीची अभिनेत्री दिसणार ‘Bigg Boss OTT 2’मध्ये, सलमान खान करणार सूत्रसंचालन

त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत त्यांच्या या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. तर अनेक नेटकरी “बिग बॉस ओटीटीला ॲडल्ट शो म्हणून जाहीर करावं,” असं म्हणत यावर टीका करत आहेत.