गेल्या काही वर्षात ओटीटी हे मनोरंजनाचे एक महत्वाचे माध्यम म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. प्रेक्षक कोणत्याही ठिकाणी ओटीटीवर उपलब्ध असलेला कार्यक्रम पाहू शकतात. विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित झालेल्या वैविध्यपूर्ण विषयांवरील सिरीजनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. चित्रपटांप्रमाणेच वेब सिरीज पाहणारा प्रेक्षक वर्गही आता वाढला आहे. गेल्या काही वर्षांत त्यावर अशा प्रकारच्या वेब सीरिज आल्या आहेत, ज्या प्रेक्षकांना खूप आवडल्या आहेत. यापैकी एक वेब सिरीज होती ‘पाताल लोक.’ या सिरीजच्या दुसऱ्या सीझनसंदर्भात आता एक मोठी माहिती सामोर येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : काय होतीस तू, काय झालीस तू…!; कतरिना कैफ नव्या लूकवरून ट्रोल

‘पाताल लोक’ वेब सिरिजचा पहिला सीझन २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. सस्पेन्सने भरलेला हा पहिला सीझन तुफान गाजला. तेव्हापासून प्रेक्षक ‘पाताळ लोक’च्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षाला आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर आता वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनच्या शूटिंगबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते जयदीप अहलावत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या सिझनच्या शूटिंगबद्दल माहिती दिली आहे.

‘पाताल लोक’मध्ये पोलिस हाथीराम चौधरीची भूमिका साकारणाऱ्या जयदीप अहलावत यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ‘पाताल लोक’ सिरीजच्या दुसऱ्या सीझनचे नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. जयदीप अहलावत म्हणाले, “‘पाताल लोक’ सीझन २ सुरू होत आहे. आम्ही १० दिवसांनी शूटिंग सुरू करणार आहोत. त्यानंतर साधारण चार-साडेचार महिने या सिरीजचे काम चालेल.”

हेही वाचा : “…तर आज ही वेळ आली नसती,” रात्री केलेल्या एका कृतीमुळे काजोल झाली ट्रोल

‘पाताल लोक’च्या दुसऱ्या सीझनमध्येही जयदीप हत्तीराम चौधरीचीच भूमिका साकारताना दिसणार आहेत. जयदीप अहलावत यांनी ‘पाताल लोक २’ साठी ५० पट जास्त मानधन आकारल्याचेही बोलले जात आहे. ‘पाताल लोक’च्या पहिल्या सीझनमध्ये ‘हाथीराम चौधरी’ची भूमिका साकारण्यासाठी तयांनी ४० लाख रुपये घेतले होते. पण पहिला सीझन गाजल्यावर ‘पाताल लोक २’ साठी जयदीप यांनी २० कोटी रुपये घेतले असल्याचे बोलले जात आहे. हा सीझन पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor jaideep ahalawat gave big information about paatal lok 2 rnv