पहिल्‍या सीझनला मिळालेल्‍या घवघवीत यशानंतर ‘सोनी लिव्‍ह’वर १३ ऑक्‍टोबर २०२३ पासून ‘शांतीत क्रांती सीझन २’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या दुसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांचे आवडते श्रेयस, प्रसन्‍न व दिनार काही साहसी बाबींचा सामना करताना दिसणार आहेत. या सिरिजमध्ये अभिनेता ललित प्रभाकर प्रसन्‍नची भूमिका साकारत आहे. या सिझनमध्ये तो आपल्याला बस चालवताना दिसणार आहे. हा अनुभव कसा होता हे त्याने सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सिरीजच्या निमित्ताने ललित प्रभाकरने पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यात ड्रायव्‍हर बनत बस चालवण्‍याचा अनुभव घेतला. विशेष म्हणजे अभिनय व संवादामध्‍ये संतुलन राखत आणि सर्वांच्‍या सुरक्षिततेची खात्री घेत त्याने सराईतपणे बस चालवली.

आणखी वाचा : ललित प्रभाकरने चाहत्यांना दिले मोठे सरप्राईज, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला, “आता पहिल्यांदाच…”

या आव्‍हानात्‍मक अनुभवाबद्दल ललित प्रभाकर म्‍हणाला, ”या सिझनमध्‍ये मी माझ्या जीवनात पहिल्‍यांदाच बस चालवण्‍याचा अनुभव घेतला. मला बस चालवण्‍याच्‍या जबाबदारीसह ड्रायव्हिंग करताना संवाद सादर करण्‍याचे व सीन्‍स परफॉर्म करण्‍याचे आव्‍हान देखील होते. या गुंतागूंतीमध्‍ये अधिक भर म्‍हणजे आम्‍हाला गजबजलेल्‍या रस्‍त्‍यावर शूटिंग करायची होती, जे खूप आव्‍हानात्‍मक होते. असे अडथळे असताना देखील आमचे दिग्‍दर्शक व संपूर्ण टीमने हे आव्‍हान पूर्ण करण्‍याच्‍या माझ्या क्षमतेवर विश्‍वास दाखवला, तसेच सर्वांच्‍या सुरक्षिततेची खात्री देखील घेतली.”

पुढे तो म्हणाला, “मला सांगावंसं वाटतं की, बस चालवताना भूमिकेमध्‍ये सामावून राहणे अत्‍यंत आव्‍हानात्‍मक होते. पण, तो अत्‍यंत अनोखा अनुभव होता, जो माझ्या स्‍मरणात सदैव राहिल.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीचं नशीब उजळलं, आता दिसणार वेब सिरीजमध्ये, म्हणाली…

भाडीपा, टीव्‍हीएफ, अरूनभ कुमार यांनी या सिरीजची निर्मिती केली आहे. तर याचं दिग्दर्शन दिग्‍दर्शक सारंग साठये व पौला मॅकग्लिन यांनी केलं आहे. या सिरीजमध्‍ये अभय महाजन, अलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्‍मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी व प्रियदर्शिनी इंदळकर प्रमुख भूमिकेत आहेत. ‘शांतीत क्रांती सीझन २’ ही सिरीज १३ ऑक्‍टोबरला प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor lalit prabhakar drives a bus for the first time shares his experience rnv