मराठी मनोरंजन सृष्टीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असलेल्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे पुष्कर जोग. एक उत्तम अभिनेता असण्याबरोबरच तो चांगला डान्सरही आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून तो चाहत्यांची संपर्कात असतो. तर आता त्याने केलेली एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बिग बॉस मराठीच्या पहिल्या. पर्वामध्ये तो सहभागी झाला होता. या कार्यक्रमामुळे त्याला नवीन ओळख मिळाली. यामुळे त्याचा चाहतावर्ग देखील खूप वाढला. तर त्यानंतर तो ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर आता हा चित्रपट ओटीटीवर दाखल झाला आहे. याबद्दल आनंद व्यक्त करताना एका पोस्टमधून त्याने त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल भाष्य केलं.

आणखी वाचा : Video: मराठ्यांच्या अखंडित लढ्याची कहाणी उलगडणार, ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित

त्याने लिहिलं, “२०१२ ते २०१८ हा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. ६ वर्ष मला क्लेशदायक स्ट्रगल करावा लागला. लोकांनी मला वाईट वागवलं. माझ्याकडे दोन पर्याय होते. एक म्हणजे हार मानणं आणि दुसरा म्हणजे लढणं. मी दुसरा पर्याय स्वीकारला. आज माझा चौथा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर आल्याचं पाहून मला खूप आनंद होत आहे. तुम्ही जिद्दी राहा. देव तुमच्या जिद्दीचं तुम्हाला नक्कीच फळ देईल.” आता त्याच्या या पोस्टवर कमेंट्स करत अनेकांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा : “विराजस, आता तरी…” लेकाच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी त्याला दिला ‘हा’ खास सल्ला, पोस्ट चर्चेत

दरम्यान, ‘व्हिक्टोरिया’ हा एक भयपट असून यात सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग आणि आशय कुलकर्णी यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. तर अभिनेता विराजस कुलकर्णी याने या चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल टाकलं.