आपल्या भारदस्त आवाजासाठी आणि दमदार अभिनय आणि व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शरद केळकर. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात शरद केळकरने बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती, शिवाय ‘तान्हाजी’ चित्रपटातील त्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. लवकरच तो ‘चोर निकाल के भागा’ या चित्रपटात दिसणार आहे. या निमित्ताने त्याने दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाविषयी आणि बायकोविषयी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद केळकर त्याच्या भारदस्त आवाजासाठी ओळखला जातो. जगभरात नावलौकिक मिळवणाऱ्या ‘बाहुबली’ या चित्रपटातील प्रभासला हिंदीत आवाज शरद केळकरने दिला होता. शरद अनेकदा कुटुंबियांबरोबरचे फोटोही शेअर करत असतो. पत्नीबरोबरचे मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसून येतो. फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत त्याला विचारण्यात आले की “चित्रपटासाठी तू पत्नीचा सल्ला घेतोस का?” त्यावर शरद म्हणाला, “माझी पत्नी (कीर्ती) नेहमीच मला आयडिया देत असते. मी माझ्या स्क्रिप्ट्स तिला वाचून दाखवतो तिला जर त्या आवडल्या नाहीत तर मी ते करत नाही. मी तिला फक्त मला आवडलेल्या गोष्टी सांगतो.”

आम्ही प्री-हनिमून….” अर्जुन कपूरबरोबरच्या लग्नाच्या चर्चांवर मलायका अरोराने सोडलं मौन

पुढे त्याला आगामी चित्रपटाविषयी विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला “हा एक थ्रिलर चित्रपट आहे. हिस्ट आणि हायजॅक यावर चित्रपटाची गोष्ट बेतली आहे. चोर कोण आहे हे कोणालाच माहीत नाही. मी चोर आहे की नाही त्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. हा चित्रपट मुलेदेखील पाहू शकतील. हा एक वेगवान आणि मनोरंजक चित्रपट आहे. कथेचा अंदाज येत नाही.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

चोर निकाल के भागा हा चित्रपट येत्या २४ मार्चला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात यामी गौतम व सनी कौशल मुख्य भूमिकेत आहेत. अजय सिंग यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor sharad kelkar said that he only do movie when his wife like the scripts spg