‘एकुलती एक’या सिनेमातून रुपेरी पडद्यावर प्रवेश करणाऱ्या सिध्दार्थ मेननने कमी वेळातच तरूणींच्या मनात घर केलं आहे . ‘पोपट’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘स्लॅमबुक’ आणि ‘राजवाडे अँड सन्स’ ‘जून’ या चित्रपटातून सिद्धार्थने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहेच, शिवाय आपण सिध्दार्थला मल्टीस्टारर ‘पोश्टर गर्ल’मधून सोनालीबरोबर रोमान्स करताना पाहिलं आहे. सिध्दार्थच्या रुपाने सिनेसृष्टीला नवा चॉकलेट बॉय मिळाला हे म्हणायला हरकत नाही.

याबरोबरच सिद्धार्थने काही हिंदी चित्रपटातही छोट्या भूमिका साकारल्या आहेत. सुपरहीट ‘गली बॉय’ या चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी सिद्धार्थला विचारणा झाली होती. ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘पटलं तर घ्या’ या टॉक शोमध्ये सिद्धार्थने या गोष्टीचा खुलासा केला. ‘पटलं तर घ्या’च्या नव्या भागात सिद्धार्थ मेननने अभिनेत्री नेहा पेंडसेसह हजेरी लावली.

आणखी वाचा : ‘कोटा फॅक्टरी’चा तिसरा सीझन येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; नेटफ्लिक्सकडून मोठी घोषणा

या मुलाखतीमध्ये दोघांनी धमाल गप्पा मारल्या, एकमेकांच्या मैत्रीबद्दल दोघे भरभरून बोलले. याबरोबरच सिद्धार्थने गली बॉयचा किस्सा शेअर केला. ‘गली बॉय’मधील एमसी शेर हे पात्र जे सिद्धांत चतुर्वेदी या अभिनेत्याने साकारलं त्या पात्रासाठी सिद्धार्थ मेननला विचारण्यात आलं होतं. सिद्धार्थ मुलाखतीदरम्यान म्हणाला, “हो, मला त्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं, त्यावेळी निर्मात्यांना त्या चित्रपटातील मुराद या पात्राच्या बरोबरच एमसी शेर हे पात्र वयाने लहान पण रॅप विश्वातील मोठी व्यक्ती अशा पठडीतलं हवं होतं. नंतर या पात्राकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षा बदलल्या आणि मी त्यात फिट बसणारा नव्हतो. त्यामुळे ती भूमिका मला मिळाली नाही.”

याबरोबरच सिद्धार्थने हा प्रकार बऱ्याच हिंदी चित्रपटाच्या बाबतीत झाल्याचा खुलासा केला. आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाचंदेखील त्याने उदाहरण दिलं. ‘दंगल’मधील अपारशक्ती खुरानाने साकारलेल्या भूमिकेसाठी सिद्धार्थ मेनननेही ऑडिशन दिली होती, पण त्यासाठी सिद्धार्थची निवड झाली नाही. सिद्धार्थ आणि नेहाने ‘जून’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट प्लॅनेट मराठी या ओटीटीवर तुम्ही पाहू शकता.

Story img Loader