बॉलीवूड अभिनेता सनी देओल नेहमी चर्चेत असतो. सनी देओलने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या चित्रपटातील अनेक डायलॉगलाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. ‘कॉफी विथ करण ८’च्या दुसऱ्या भागात अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल हजेरी लावणार आहेत. या भागात सनी देओलने अनेक गुपिते उलघडली आहेत. दरम्यान सनी देओलने त्याची पत्नी पूजाबाबत मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्याला धमक्या; आगामी चित्रपट ‘बस्तर’ ठरतोय निमित्त

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा

इतर सेलिब्रिटींच्या पत्नी प्रकाशझोतात असतात. मात्र सनीची पत्नी लाइमलाइट पासून नेहमीच दूर असते. ‘कॉफी विथ करण ८’च्या दुसऱ्या भागात सनी देओलने पूजाच्या लाईमलाईटपासून लांब राहण्यामागचं कारणं सांगितलं आहे. सनी म्हणाला, “आम्ही सगळे वैयक्तिकरित्या असेच आहोत. मी पूर्ण दिवस काम केल्यानंतर अशा जागी जाणं पसंत करेन जिथं मला शांतता मिळेल. जेव्हा तुम्ही इकडे तिकडे जाता तेव्हा लोक तुमच्याकडे टक लावून बघत असतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळते तेव्हा तेव्हा आम्ही फिरायला परदेशात जातो कारण तिथं तुम्हाला कुणी त्रास देत नाही.”

सनी आणि पूजा यांनी १९८४ साली गूपचूप लग्न केलं. पूजा एक लेखिका देखील आहे तसेच तिने चित्रपटांमध्येही काम केलं आहे. १९६६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिम्मत’ या चित्रपटात तिने पाहुण्यात कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर पूजाने कोणत्याच चित्रपटात काम केलं नाही. अभिनयाबरोबर पूजाने सनी देओलच्या ‘यमला पगला दीवाना-२’ या चित्रपटाची कथा लिहिली होती.

हेही वाचा- कार्तिक आर्यन काँग्रेसमध्ये? प्रचार करणारी ‘ती’ जाहिरात व्हायरल; अभिनेता स्पष्टीकरण देत म्हणाला…

सनीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सनीचा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. ५०० कोटींपंक्षा अधिकची कमाई करत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले होते. आता सनी रणवीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात सनी हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सनीचा ‘अपने २’, ‘यमला पगला दिवाना ४’ ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader