‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वातून नुकतीच बाहेर झालेली अभिनेत्री आकांक्षा पुरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात घडलेल्या गोष्टी वेगवेगळ्या मुलाखतीद्वारे ती सांगताना दिसत आहे. शोमध्ये सलमान खाननं तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तिला साधं विचारलंही नाही, असं आकांक्षानं ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं होतं. पण, आता आकांक्षानं सलमानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आकांक्षानं नुकताच सोशल मीडियावर एका मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती एक टास्क खेळताना दिसत आहे. या टास्कमध्ये तिला लग्न, किस, हूकअप हे कोणाबरोबर करशील, असं विचारलं जातं. तसेच तिला उत्तरासाठी पर्याय दिले जातात; ज्यामध्ये सलमान खान, अविनाश सजदेव व जैद हदीद हे पर्याय असतात. त्यावर आकांक्षा म्हणते, “लग्न सलमान खानशी करायला आवडेल. जैद हदीदला अगोदरच किस केल्यामुळे आता मी अविनाशला किस करेन. आणि जैदबरोबर हूकअप करायला आवडेल. सलमान खानला किस आवडत नाही, हे त्यानं स्पष्टच सांगितल्यामुळे मी त्याला किसच्या कॅटेगरीमध्ये टाकू शकत नाही.”

हेही वाचा – Video: नाकाची सर्जरी झाल्यानंतर शाहरुख खान भारतात परतला; पत्नी व मुलाबरोबरचा व्हिडीओ आला समोर

त्यावर मुलाखतदार विचारतो, “लग्नानंतर किस करणार नाही का?” या प्रश्नावर आकांक्षा म्हणते, “जर सलमाननं परवानगी दिली तर ना. कारण- बिग बॉसच्या घरात केलेल्या किसचा मुद्दा इतका मोठा झालाय की, त्यानंतर सलमानला किस करतानाही भीती वाटेल.” आकांक्षाचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंडबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, जाणून घ्या कोण आहे तो?

दरम्यान, शोमधून बाहेर आल्यानंतर आकांक्षानं बिग बॉसवर नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणाली, “जिओ ॲपवर त्या एपिसोडच्या थंबनेलवर किस करताना माझा आणि जैदचा फोटो आहे. तसेच ‘आतापर्यंतचा सर्वांत हॉट किस’, असं व्हिडीओखाली लिहिण्यात आलं आहे. अशा प्रकारे जिओ ॲपद्वारे किसिंगचा मुद्दा अधिक प्रमोट केला जातोय.”

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress akanksha puri wants to marry salman khan and kiss to avinash sachdev pps