अभिनेत्री अमृता सुभाष ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर पॉझिटिव्ह प्रेग्नेन्सी किटचा फोटो शेअर केला होता. यामुळे ती चर्चेत आली होती. यानंतर तिने ही एका चित्रपटाची घोषणा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता तिच्या आगामी ‘वंडर वुमन’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
‘वंडर वुमन’च्या ट्रेलरची सुरुवात काही गरोदर महिलांच्या प्रसवपूर्व वर्गाने होते. यात सुमाना नावाच्या गरोदर महिलेच्या प्रसवपूर्व वर्गात घेऊन जातो जेथे मातृत्वाच्या शेवटच्या टप्प्यातून जात असताना त्यांचे स्वागत केले जाते. या ट्रेलरमध्ये एक्सपेक्टिंग पेरेंट्ससाठी सुरक्षित आश्रयस्थानाची एक झलक पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “ते स्वतः मोठे होतात आणि..” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील विनोदवीरांच्या एक्झिटवर दिग्दर्शकाने मांडले मत
या कथेमध्ये वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील महिलांमधील नाते आणि जीवनाला सामोरे जाण्याची त्यांची मजेशीर आणि उत्साह पद्धत पाहायला मिळत आहे. ही महिला पात्रे देशभरातील सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडतील, अशी पाहायला मिळत आहे. गर्भधारणा आणि त्यांची नवीन मैत्री एकमेकांना कशी प्रेरणा देते अशी ही कथा त्यांच्या आयुष्यातील एक झलक आहे. “एक बच्चे को पालने के लिए एक गांव की जरूरत होती है” असे त्यात एक डायलॉग पाहायला मिळत आहे.
एका नवजात मुलाला या जगात आणण्यासाठी पालकांनी केलेल्या प्रयत्नांचे उदाहरण देणारा हा एक उत्तम चित्रपट पाहायला मिळत आहे. हा चित्रपट आरएसव्हिपी (RSVP) आणि फ्लाइंग युनिकॉर्न एंटरटेनमेंट प्रेझेंटेशन, रॉनी स्क्रूवाला आणि आशी दुआ साराद्वारे निर्मित, अंजली मेननद्वारे लिखित आणि दिग्दर्शित असा आहे. हा चित्रपट १८ नोव्हेंबरपासून सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नादिया मोईडू, नित्या मेनन, पार्वती थिरुवोथू, पद्मप्रिया जानकीरामन, सायोनारा फिलिप, अर्चना पद्मिनी आणि अमृता सुभाष यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
आणखी वाचा : “महेश मांजरेकर दबंग आहेत त्यांनी…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक
या नोराच्या भूमिकेत नित्या मेनन, मिनीच्या भूमिकेत पार्वती थिरुवोथू, वेन्नीच्या भूमिकेत पद्मप्रिया जानकीरामन, सायाच्या भूमिकेत सायोनारा फिलिप, ग्रेसीच्या भूमिकेत अर्चना पद्मिनी आणि जयाच्या भूमिकेत अमृता सुभाष पाहायला मिळत आहे.