‘बिग बॉस हिंदी’चं पहिलं ओटीटी पर्व सुपरहिट ठरल्यानंतर आता या शोचं दुसरा ओटीटी पर्व सुरू झालं आहे. या पर्वाच्या पहिल्या भागापासून हे पर्व ‘या स्पर्धकांमुळे’ चांगलंच चर्चेत आलं आहे. हे पर्व सुरू झाल्या झाल्या दुसऱ्या दिवसापासूनच या स्पर्धकांमध्ये चांगलीच भांडणं होताना दिसत आहेत. तर आता आलिया सिद्दिकी आणि पूजा भट्ट यांच्यात मोठा वाद झाला.

या पर्वामध्ये निर्माती-अभिनेत्री पूजा भट्ट  आणि नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी आलिया सिद्दिकी स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या आहेत. गेल्या भागातील टास्कदरम्यान त्या दोघींमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यादरम्यान पूजा भट्टने नवाजुद्दीनची पत्नी आलियाला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे काही दिवसांपासून आलिया तिच्या लग्नाविषयी चर्चा करून सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”

आणखी वाचा : Bigg boss 16: विजेता स्पर्धक होणार मालामाल, बक्षीस म्हणून मिळणार तब्बल ‘इतके’ लाख

आलिया पूजाच्या विरोधात काहीतरी बोलत होती आणि ते पूजाला कळलं. तेव्हा तिनं येऊन आलियाची चांगलीच शिकवणी घेतली. पूजा म्हणाली, “तुझ्या संसारातील गोष्टी सार्वजनिक करणं आधी थांबव. तुझा शहाणपणा बंद कर. जगात तूच एकटीच अशी नाहीस की जिचं लग्न मोडलं आहे. माझंही लग्न मोडलं आहे. तेव्हा कशावरूनही भांडवल करणं थांबव.”

पुढे पूजा म्हणाली, “केवळ माझंच नाही तर आतापर्यंत अनेक महिलांची लग्नं मोडली आहेत. प्रत्येकीची कारणं वेगवेगळी आहेत. म्हणून त्या रडत बसतात का? आपण आपल्या अडचणींचा इतका बाऊ का करतो; ज्यावरून आपल्याला लोकांनी सिम्पथी द्यावी, असं वाटत असतं. लोकांनी आपल्याला तेव्हा मदत नाही केली, तर मग त्यांच्यावर आपण चिडतो आणि हे करणं चुकीचं आहे.”

हेही वाचा : “मला कॉलर धरून बाहेर काढलं…,” नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितला बॉलीवूडमध्ये काम करताना आलेला धक्कादायक अनुभव, म्हणाला…

याचबरोबर त्या खेळामध्ये तू कोणाला नॉमिनेट करणार, असं विचारल्यावर पूजानं आलियाचं नाव घेतलं. मी तिच्याविषयी गेल्या एका आठवड्यापासून खूपच गोंधळलेली आहे. मी तिचं जे व्यक्तिमत्त्व पाहिलं आहे, ते खूप घाबरवून टाकणारं आहे, असं कारण पूजानं दिलं.

Story img Loader