अभिनेत्री काजोलने बॉलीवूड चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करून प्रेक्षकांचे मन जिंकले. यानंतर आता अभिनेत्री ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. काजोलची ‘द ट्रायल : प्यार, कानून, धोका’ ही वेब सीरिज १४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अभिनेत्री या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने अजय देवगणशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला? याबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा : “‘गदर २’ फ्लॉप होणार” प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत; म्हणाला, “कपिल शर्मा चित्रपटांसाठी पनौती…”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

‘द ट्रायल…’ सीरिजच्या प्रमोशनच्या दरम्यान काजोलने वैयक्तिक आयुष्याबाबत काही खुलासे केले आहेत. अजयबरोबर लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय असल्याचे काजोलने सांगितले. अभिनेत्री पुढे म्हणाली, “मला माझ्या आयुष्यात अनेकदा कठीण निर्णय घ्यावे लागले. त्यापैकी एक निर्णय म्हणजे करिअर शिखरावर असताना अजयशी माझे लग्न झाले. त्याच्याशी लग्न करणे माझ्यासाठी गेम चेंजर ठरले कारण इथून पुढे चित्रपटसृष्टीत काम करायचे की नाही मला माहिती नव्हते. “

हेही वाचा : ‘आदिपुरुष’मध्ये रावणाची भूमिका सैफ अली खानला नव्हे तर ‘या’ बॉलीवूड सुपरस्टारला केली होती ऑफर; अभिनेत्याने भूमिका नाकारली कारण…

काजोलने पुढे सांगितले, “वडिलांनी मला पुन्हा चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याबाबत खूप काळजीपूर्वक विचार करण्यास सांगितले. ते म्हणायचे की, ‘प्रेक्षकांनी एकदा अभिनेत्याबद्दल मनात बनवलेला विचार पुन्हा बदलणे खूप कठीण आहे.’ अर्थात तेव्हा मी माझ्या वडिलांच्या मताशी सहमत नव्हते परंतु, कालांतराने त्यांनी दिलेला प्रत्येक सल्ला बरोबर होता हे काळाने सिद्धा झाले.”

हेही वाचा : “आधी लगीन कोंढाण्याचं, मग…” बहुचर्चित ‘सुभेदार’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित, संवाद ऐकून शिवप्रेमी भारावले

दरम्यान, अभिनेत्री काजोल ‘द ट्रायल : प्यार, कानून, धोका’ वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ही सीरिज १४ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल. या मालिकेत एकूण आठ भाग आहेत.

Story img Loader