बॉलीवूड कलाकारांच्या बाबतीत सातत्याने नवनवीन गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काहींच्या अफेअरच्या, काहींच्या घटस्फोटाच्या तर काही वेळा कलाकारांच्या निधनाच्या खोट्या बातम्याही पसरतात. अभिनेत्री काजोलने तिच्या बाबतीतला असाच एक किस्सा सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काजोल सध्या त्याच्या ‘दो पत्ती’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संपूर्ण टीमने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली. या शोमध्ये काजोलने तिच्याबद्दलची तिने ऐकलेली सर्वात विचित्र अफवा कोणती ते सांगितलं. स्वत:चे नाव कधी गुगल करतेस का, असा प्रश्न कपिल शर्माने विचारला. त्यावर “मी काहीच सर्च करण्याची गरज नाही. माझ्याबद्दलची कोणतीही विचित्र गोष्ट सर्वात आधी मला कळते,” असं ती म्हणाली.

हेही वाचा – ‘कबूल है’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, देवभूमीतील नॅशनल पार्कमध्ये केलं लग्न, फोटो आले समोर

स्वतःबद्दलच्या सर्वात विचित्र अफवेबद्दल बोलताना तिच्या मृत्यूच्या अफवांचा उल्लेख केला. काजोल म्हणाली, “मला दर ५-१० वर्षांनी मारतात. कोणीतरी माझ्या आईला (अभिनेत्री तनुजा) फोन करून सांगितलं की मी ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान क्रॅश झाले आहे. ही सोशल मीडियाच्या आधीची गोष्ट आहे. त्यामुळे माझ्या आईला ही गोष्ट खरी आहे की खोटी हे जाणून घ्यायला बरीच वाट पाहावी लागली होती.”

हेही वाचा – पृथ्वीक प्रतापच्या आयुष्यात आली प्राजक्ता! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी दिल्या शुभेच्छा; शिवाली परब म्हणाली…

सोशल मीडिया आल्यानंतरचा एक किस्सा काजोलने सांगितला. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात म्हटलं होतं की माझं निधन झालं आहे. हा सगळा मूर्खपणा आहे, असं काजोल म्हणाली. या एपिसोडमध्ये कपिल शर्माने काजोलची गंमत केली. कपिल म्हणाला, अजय देवगणने चित्रपटांमध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका इतक्या वेळा साकारली आहे की आता त्याच्यासाठी जुहू पोलीस ठाण्यात एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली आहे. कपिलच्या या विनोदावर सगळे हसू लागतात.

हेही वाचा – पृथ्वीक प्रतापच्या पत्नीचे नाव काय? दोघांचे लग्नाआधीचे फोटो पाहिलेत का?

शशांक चतुर्वेदी दिग्दर्शित ‘दो पत्ती’ सिनेमाबद्दल बोलायचं झाल्यास यात काजोलने पोलिसाची भूमिका केली आहे. यातून टीव्ही अभिनेता शाहीर शेखने चित्रपटांमध्ये पदार्पण केलं आहे. तर, क्रिती सेनॉन यात दुहेरी भूमिकेत आहे. या चित्रपटात तन्वी आझमी आणि ब्रिजेंद्र काला यांच्यादेखील महत्त्वाच्या आहेत. हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress kajol reveals weirdest rumour about her says someone called my mom and said my plane crashed hrc