गेले अनेक दिवस अभिनेत्री सुश्मिता सेनच्या ‘ताली’ या वेब सीरिजची सर्वत्र खूप चर्चा होती. अखेर ही वेब सीरिज १५ ऑगस्टला प्रदर्शित झाली आहे. ताली ही वेब सिरीज तृतीयपंथीयांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या, त्यांच्या हक्कांसाठी उभ्या राहणाऱ्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे.

या वेब सिरीजला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिरीजचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे. तर यामध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन हिने प्रमुख भूमिका साकारली आहे. तर गौरी सावंत यांच्या बालपणीची भूमिका ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखची पत्नी अभिनेत्री कृतिका देव हिने साकारली आहे. तर आता या सिरिजमध्ये काम करताना तिला आलेला अनुभव तिने शेअर केला आहे. रस्त्यावरची भिकारी समजून तिला एका व्यक्तीने १० रुपये दिले असं म्हणत त्यावेळी घडलेली गोष्ट तिने सांगितली आहे.

shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण

आणखी वाचा : Video: ‘आई कुठे काय करते’फेम ‘या’ अभिनेत्याची पत्नी दिसणार ‘ताली’मध्ये गौरी सावंत यांच्या बालपणीच्या भूमिकेत, पहिली झलक समोर

या सिरिजमध्ये तिच्यासाठी सर्वात कठीण सीन कोणता हे तिने नुकतंच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ती म्हणाली, “गणेशला मुंबईच्या रस्त्यावर भीक मागायला लावली जाते हा सीन माझ्यासाठी कठीण होता. आम्ही छुप्या कॅमेऱ्यांनी खऱ्या लोकेशन्सवर शुटींग केलं. मी रस्त्यावर एकटी उभी होते. तेव्हा ट्रॅफिक सिग्नल लाल होताच मला भीक मागण्यासाठी रस्त्यावर जायचं होतं. तेव्हा एका माणसाने मला भिकारी समजून मला १० रुपये दिले आणि आशीर्वाद दिला.”

हेही वाचा : “आम्ही तृतीयपंथीयांच्या वस्तीत गेलो तेव्हा…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखच्या पत्नीने सांगितला ‘ताली’च्या शूटिंगचा अनुभव

पुढे ती म्हणाली, तो प्रसंग आठवून आजही मला हसायला येतं. त्या माणसाला मी खरंच भीक मागत आहे असं वाटलं. माझ्या अभिनयाला मिळालेली ही पोचपावती होती असं म्हणता येईल. पण तेव्हा कळलं की गौरी सावंत आहेत आणि त्यांच्या सारख्या किती आहेत माहीत नाही, ज्यांना आजही या परिस्थितीतून जावं लागत आहे. मला या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करणं खूप कठीण गेलं.”

Story img Loader