गेले अनेक दिवस अभिनेत्री सुश्मिता सेनच्याच्या आगामी ‘ताली’ या वेब सीरिजची सर्वत्र खूप चर्चा आहे. ‘ताली’ ही वेब सीरिज येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. आज या सिरीजचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यातून या सिरीजमध्ये गौरी सावंत यांच्या शालेय वयातील भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ताली ही वेब सिरीज तृतीयपंथीयांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या, त्यांच्या हक्कांसाठी उभ्या राहणाऱ्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिरीजमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन गौरी सावंत यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आता प्रदर्शित झालेला ट्रेलरमध्ये त्यांच्या बालपणीची भूमिका कोण साकारणार हेही समोर आलं आहे.

आणखी वाचा : “फूड सेंटर सुरू करायचं ठरवलं तेव्हा…”, लेकाच्या हॉटेलबद्दल सुप्रिया पाठारेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “पाव भाजीबरोबरच इथे…”

गेले अनेक दिवस सर्वजण या सिरीजच्या ट्रेलरची वाट बघत होते. तर आज प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरमधून गौरी सावंत यांच्या बालपणीपासून आत्तापर्यंत असा जीवन प्रवास उलगडला गेला आहे. या ट्रेलरची सुरुवात त्यांच्या लहानपणापासून होते. त्यांच्या लहानपणीची भूमिका अभिनेत्री कृतिका देव साकारत आहे. कृतिका देव ही अभिनेता अभिषेक देशमुखची पत्नी आहे. अभिषेक ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत यश ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तर कृतिकाने देखील याआधी राजवाडे अँड सन्स, प्राईम टाईम, बकेट लिस्ट, पानिपत, हवाईजादा अशा विविध मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून महत्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे.

हेही वाचा : Video: टुमदार घर, बाजूला हिरवंगार शेत…; ‘बिग बॉस मराठी’ फेम विकास पाटीलने दाखवली गावाकडील शेतीवाडीची झलक

या ट्रेलरमध्ये दिसत असलेल्या कृतिकाच्या अंदाजाचं सर्वजण कौतुक करत आहेत. त्यावर कमेंट करत तिचे चाहते या सिरीजमधील तिचं काम बघण्यासाठी उत्सुकता दर्शवत आहेत. या वेब सीरिजचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे. तर याचं लेखन क्षितीज पटवर्धनने केलं आहे. ही वेबसीरिज १५ ऑगस्ट रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित केली जाणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress krutika deo to play role of young gauri sawant in sushmita sen starrer taali web series rnv
Show comments