आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे ती घराघरात पोहोचली. मानसी नाईक आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

मानसी नाईक ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकतंच मानसी नाईकने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. मानसी नाईक ही लवकरच हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. तिने तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे.
आणखी वाचा : “एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितलेले नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याचे कारण

Amol Kolhe on Devendra Fadnavis
Amol Kolhe: “…याचा अर्थ महायुतीचे सरकारच येणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत अमोल कोल्हेंची सूचक टिप्पणी!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
What Justice Chandiwal Said About Sachin Waze?
Justice Chandiwal : जस्टिस चांदिवाल यांचं वक्तव्य, “सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, त्यांनी मला समित देशमुखांचा मेसेज..”
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!

मानसी नाईकने नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती म्हणाली, “मला स्वत:ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझा पहिला हिंदी चित्रपट. एक नवीन सुरुवात – ‘सिफर’. माझा पहिला हिंदी वेब शो. यंदाचा माझा वाढदिवस अधिक स्पेशल झाला. शुभेच्छा असू द्या.”

“एक नवी सुरुवात. माझ्या वाढदिवशीच माझ्या पहिल्या सिफर या हिंदी चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित. तुमच्या आशीर्वाद आणि पाठिंब्याची खूप गरज आहे”, असेही तिने यात म्हटले आहे.

मानसी नाईकच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे नाव सिफर असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन विनोद वैद्य यांनी केले आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे देखील अजून गुलदस्त्यात आहे.