अभिनेत्री नेहा पेंडसेने अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. बालपणापासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केलेल्या नेहाला ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. नेहाने अनेक मालिका व चित्रपटांत काम केलं आहे. मराठीबरोबरच तिने हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाचा ठसा उमटवला.

नेहाने नुकतीच प्लॅनेट मराठीच्या पटलं तर घ्या या कार्यक्रमात हजेरी लावली. या शोमध्ये नेहासह अभिनेता सिद्धार्थ मेननही सहभागी झाला होता. या शोमधील रॅपिड फायर राऊंडमध्ये नेहाला काही व्यक्तींची नावं सांगण्यात आली. त्या व्यक्तींचं वर्णन तिला एका शब्दात करायचं होतं.

Kapil Dev Reaction on Yograj Singh Claim That he Went to His House with Pistol to Kill Watch Video
Kapil Dev on Yograj Singh: “कोण आहे, कोणाबद्दल बोलताय?”, कपिल देव यांचं योगराज सिंह यांच्या बंदुकीने गोळी मारण्याच्या घटनेवर मोठं वक्तव्य; पाहा VIDEO
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
Aishwarya Narkar
“जर मला डिवचलं, तर मी…”, ऐश्वर्या नारकर ट्रोल करणाऱ्यांच्या बाबतीत करतात ‘ही’ गोष्ट; म्हणाल्या, “काय दिवे…”
aishwarya narkar faces trolling for wearing sleeveless blouse
स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे शिव्या घातल्या, संस्कृती दाखवली…; ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सना विचारला जाब, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाल्या…
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

हेही वाचा>> निधनानंतर सतीश कौशिक यांच्या कंपनीची मालकी कोणाकडे जाणार? कुटुंबातील व्यक्तीचा मोठा खुलासा, म्हणाला “त्यांची पत्नी…”

हेही वाचा>> स्वरा भास्कर-फहाद अहमदच्या वेडिंग रिसेप्शनचे फोटो व्हायरल, अभिनेत्रीच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष

सिद्धार्थ मेननचं नाव घेताच नेहाने “हुशार” असं उत्तर दिलं. जितेंद्र जोशीचं वर्णन नेहाने “मनोरंजनात्मक व्यक्ती” असं केलं. संस्कृती बालुगडेला नेहा “बच्चा” तर अमृता खानविलकरला “पटाका” म्हणाली. कपिल शर्माचं नाव विचारल्यावर नेहाने “चांगली व्यक्ती” असं उत्तर दिलं. “चांगली व्यक्ती पण वाईट सवयी” असंही नेहा पुढे म्हणाली. नेहाने कपिल शर्माबाबत केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

हेही वाचा>> Video: “सात समुंदर…” गाण्यावर अनन्यासह थिरकले चंकी पांडे, बापलेकीच्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल

‘भाभीजी घर पर है’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या नेहाने ‘मे आय कम इन मॅडम’, ‘हसरते’, ‘शू कोई है’ या मालिकांमध्येही काम केलं आहे. याबरोबरच तिने अनेक रिएलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘फॅमिली टाईम विथ कपिल’ या शोमध्येही ती दिसली होती.

Story img Loader