अभिनेत्री नेहा पेंडसेने मराठीसह हिंदी मालिका, चित्रपटांमध्येही काम करत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या ती मालिका, चित्रपटांपासून दूर आहे. पण सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी नेहा संपर्क साधताना दिसते. विविध फोटो व व्हिडीओ नेहा पोस्ट करताना दिसते. कामाबरोबरच नेहाचं खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिलं आहे. नुकतचं तिने एका मुलाखतीत खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं.

आणखी वाचा – Video : लेकीच्या लग्नाचा आनंद गगनात मावेना, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा होणाऱ्या जावयाबरोबर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण

२०२०मध्ये नेहा शार्दुलसह विवाहबंधनात अडकली. तिने अगदी थाटामाटात लग्न केलं. सध्या नेहा तिच्या सुखी संसारामध्ये रमली आहे. पण हे सगळं करत असताना नेहा तिची आवड जोपासते. प्लॅनेट मराठीला दिलेल्या मुलाखतीत नेहाला तिच्या खासगी आयुष्याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तिने दिलेलं उत्तर अगदी लक्षवेधी ठरलं.

आणखी वाचा – इस्लाम धर्मासाठी बॉलिवूड सोडणारी सना खान ३४व्या वर्षी होणार आई, म्हणाली, “लवकरच…”

“आम्ही असं ऐकलं आहे की, तू सहा मुलांची आई आहेस?” असं नेहाला विचारण्यात आलं. यावर नेहा म्हणाली, “हो, मी सहा मुलांची आई आहे. सहा मुलं म्हणजे माझ्याकडे सहा कुत्री आहेत. मला आणि माझ्या नवऱ्याला पाळीव प्राण्यांची आवड आहे. त्यांच्याकडे आधीच चार कुत्रे होते. आमचं लग्न झाल्यानंतर दोन पुन्हा आम्ही घेतले.”

आणखी वाचा – Video : स्वयंपाक घर, वॉर्डरोब, अन्…; फारच सुंदर आहे वनिता खरातचं घर; व्हिडीओमध्ये दाखवली झलक

“ही सहा मुलं म्हणजे आमचं आयुष्य आहेत. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. मी घरी असताना माझ्या आजूबाजूला कोणतीच व्यक्ती येऊ शकत नाही. मी त्यांच्याबरोबर सुरक्षित असते”. नेहाने हे उत्तर देताच तिचं पाळीव प्राण्यांवर किती प्रेम आहे हे दिसून येतं. शिवाय आवडीने ती या सगळ्यांना सांभाळते.

Story img Loader