प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मध्यंतरी प्राजक्ता ‘रानबाजार’ या तिच्या वेबसीरिजमुळे चांगलीच चर्चेत आली होती. या सीरिजमध्ये अभिनेत्रीने पहिल्यांदाच बोल्ड भूमिका साकारली होती. सीरिज प्रदर्शित झाल्यावर आपण ट्रोल होणार याची कल्पना प्राजक्ताला असल्यामुळे तिने या सीरिजसाठी सुरुवातीला नकार कळवला होता. परंतु, त्यानंतर तिचं अभिनेत्री अमृता खानविलकरशी बोलणं झालं. अमृताने तिला नेमका काय सल्ला दिला? याचा खुलासा प्राजक्ताने नुकताच एका मुलाखतीदरम्यान केला आहे.
हेही वाचा : “तामिळ, तेलुगू चित्रपट सोडून…”, प्रसाद ओकने केली प्रेक्षकांना कळकळीची विनंती, म्हणाला “मराठी चित्रपटांवर…”
प्राजक्ता माळीने ‘रानबाजार’या सीरिजमध्ये सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. या वेब सीरिजसाठी अभिनेत्रीने सुरुवातीला नकार दिला होता. याबद्दल तिने महाराष्ट्र टाइम्सच्या मुलाखतीत खुलासा केला आहे. प्राजक्ता म्हणाली, “कोणाताही प्रोजेक्ट निवडताना आपण सुरुवातीला खूप विचार करतो. आपली एक इमेज असते…त्यामुळे प्रेक्षकांना ही भूमिका आवडेल की नाही? या सगळ्या गोष्टींचा विचार कलाकार करतात. ‘रानबाजार’ सीरिज करताना मी या सगळ्या गोष्टींचा विचार केला होता. मला स्क्रिप्ट प्रचंड आवडली होती. परंतु, तो विशिष्ट टीझर टीमच्या डोक्यात आधीपासूनच होता. त्यामुळे सीरिज प्रदर्शित झाल्यावर प्रचंड ट्रोलिंग होणार याची कल्पना मला होती…माझ्या डोक्यात खूप विचार सुरु होते.”
हेही वाचा : “जवानमध्ये एवढ्या मुली कशाला?”, चाहत्याच्या प्रश्नाला शाहरुख खानने दिलं स्पष्ट उत्तर, सर्वत्र होतंय कौतुक
माझ्या मनातील असंख्य विचारांमुळे मी ‘रानबाजार’ही सीरिज सोडली होती. सीरिजचं एक नरेशन माझ्याशिवाय झालंही होतं. पण, यानंतर माझं अमृताशी बोलणं झालं. अमृता खानविलकरने मला खूप शिव्या घातल्या…”अगं वेडी आहेस का तू? अभिजीत पानसेंबरोबर काम करायला मिळतंय सोडू नकोस.” असं ती मला म्हणाली होती. पुढे, प्रसाद ओकशी बोलणं झाल्यावर तो म्हणाला होता, “आता इमेज वगैरेचा विचार करू नकोस…तू ही सीरिज करून टाक.” या दोघांच्या सल्ल्यानंतर प्राजक्ताने पुन्हा विचार करून सीरिजमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, उर्मिला कोठारे, वैभव मांगले, अनंत जोग, अभिजित पानसे, गिरीश दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार हे दिग्गज कलाकार या सीरिजमध्ये झळकले आहेत.