गेले अनेक दिवस अभिनेत्री सुश्मिता सेनच्याच्या आगामी ‘ताली’ या वेब सीरिजची सर्वत्र खूप चर्चा होती. अखेर ही वेब सीरिज १५ ऑगस्टला प्रदर्शित झाली आहे. ताली ही वेब सिरीज तृतीयपंथीयांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या, त्यांच्या हक्कांसाठी उभ्या राहणाऱ्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या वेब सिरीजला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन हिने प्रमुख भूमिका साकारली आहे तर मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, कृतिका देव या देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. या वेब सिरीज मध्ये अभिनेता सोबत जोशी यांनी तृतीयपंथीयाची भूमिका साकारली आहे. तर आता ही सिरीज पाहिल्यावर अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : Video: ‘आई कुठे काय करते’फेम ‘या’ अभिनेत्याची पत्नी दिसणार ‘ताली’मध्ये गौरी सावंत यांच्या बालपणीच्या भूमिकेत, पहिली झलक समोर

शुभांगी गोखले नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असतात. नुकतीच त्यांनी ही वेब सिरीज पाहिली आणि ती त्यांना खूप आवडली. ही वेब सिरीज पाहिल्यावर त्यांनी सोशल मीडियावर याबद्दल एक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिलं, “श्री गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित ‘ताली’ ही वेबसिरीज जिओ सिनेमावर दाखल झालीये…कमाल…पेपर, बातम्या, टीव्ही, मुलाखतींमधून श्री गौरी यांना जाणून होतेच. क्षितीज पटवर्धन, किती नीटसपणे, नेमकं आणि परिणामकारक लेखन केलं आहेस. हेमांगी, ऐश्वर्या, नंदू माधव, शीतल, कृतिका आणि सुव्रत तुमची कामं फार फार आवडली. दिग्दर्शक रवी जाधव “one more feather in his cap” आणि सुश्मिताजी, तुम्ही “चपखल” हा शब्द जिवंत केला आहे. Doing a role च्या पलीकडे being a role काय ताकदीने दाखवलं आहे तुम्ही. एव्हाना मराठी चांगलंच शिकला असाल, त्यामुळे एवढंच म्हणेन, “चाबूक” झालंय काम!!! श्रीगौरी सावंत यांच्या आयुष्यासारखंच.”

हेही वाचा : Video: सुश्मिता सेन अन् तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल पुन्हा आले एकत्र? ‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

शुभांगी गोखले यांनी केलेली ही पोस्ट आता खूप चर्चेत आली आहे. तर त्यावर सुव्रतने देखील कमेंट करत त्यांचे आभार मानले. त्याने लिहिलं, “तुझ्याकडून कौतुकाची थाप मिळाली, बास आणि काय हवं? तुला आवडली याचा विशेष आनंद आहे.”