अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिने दिलेल्या इंटिमेट सीनमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तमन्ना भाटियाची ‘जी करदा’ ही वेब सीरिज १५ जूनला अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली. करिअरमध्ये पहिल्यांदाच ‘जी करदा’ सीरिजमध्ये तमन्नाने बोल्ड इंटिमेट सीन शूट केले. ते पाहिल्यावर नेटकरी चांगलेच नाराज झाले. आता त्यावर तमन्नाने स्पष्टीकरण दिलं आहे.
तमन्ना भाटियाचे ‘जी करदा’ सीरिजमधील इंटिमेट सीन सोशल मीडियावर व्हायरल होऊन तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. “तुला लाज वाटत नाही का?”, “हे सीन करण्याआधी तू थोडा तरी विचार करायला हवा होतास,” असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
‘जी करदा’ या सिरीजमध्ये सुहेल नय्यरबरोबर बोल्ड सीन देण्याबद्दल ती म्हणाली, “हा सीन कोणालाही आकर्षित करण्यासाठी नाही. या सिरीजमधील लावण्या आणि ऋषभ यांच्यात असलेलं नातं दाखवण्यासाठी हा सीन महत्त्वाचा होता. जेव्हा तुम्ही रिलेशनशिप ड्रामा दाखवतात तेव्हा असे सीन्स प्रेक्षकांना आवडो किंवा न आवडो; ते महत्त्वाची भूमिका बजावतात. हा बोल्ड सीन देताना सुहेलने मला खूप कम्फर्टेबल केलं.” तर सुहेलही म्हणाला की, हा इंटिमेट सीन देताना त्याला खूप दडपण आलं होतं. पण तमन्नाने मला सांभाळून घेतलं.”
दरम्यान, तमन्नाच्या ‘जी करदा’ या ८ भागांच्या रोमॅंटिक ड्रामा असलेल्या वेब सीरिजचे दिग्दर्शन अरुणीता शर्मा यांनी केले आहे. यामध्ये तमन्ना भाटिया, सुहेल नय्यर, आशिम गुलाटी आणि अन्या सिंह हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.