बॉलिवूडच्या अभिनेत्री कायमच आपल्या चित्रपटांमुळे, लुक्समुळे चर्चेत असतात. अभिनेत्री यामी गौतम अशीच एक बॉलिवूडची गुणी अभिनेत्री. आज तिचा वाढदिवस आहे. यामी गौतमचा जन्म हिमाचल प्रदेशच्या बिलासपुर येथे झाला. सध्या यामी चर्चेत आली आहे ती तिच्या आगामी चित्रपटामुळे., ‘लॉस्ट’ हा तिचा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
यामीचा लॉस्ट हा चित्रपट एक थ्रिलर असून सत्य घटनांवर आधारित असणार आहे. एक नाट्यकर्मीच्या अचानक बेपत्ता होण्यामागची सत्यता जाणून घेण्यासाठी एक तरुण क्राईम रिपोर्टर कामाला लागतो अशी या चित्रपटाची कथा असणार आहे. श्यामल सेनगुप्ता यांनी चित्रपटाचे लेखन केले असून संवाद रितेश शाह यांचे आहेत. नुकताच हा चित्रपट गोव्यातील इफ्फी चित्रपट महोत्सवामध्ये दाखवण्यात आला.
आमिर खानच्या लेकीच्या साखरपुड्याला ‘दंगल’ गर्लने लावली हजेरी; पाहा फोटो
यामीदेखील या चित्रपटाबाबत उत्सुक आहे . हा चित्रपट झी ५ वर लवकरच प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी अजून तारीख जाहीर केली नाही . या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओजने केली आहे. ‘लॉस्ट’ मध्ये पंकज कपूर, राहुल खन्ना, नील भूपालम, पिया बाजपी आणि तुषार पांडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
दरम्यान यामीने ‘चांद के पार चलो’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. तसंच ती ‘यह प्यार न होगा कम’ मध्ये ती गौरव खन्ना बरोबर दिसली. यामीचा अभिनय प्रेक्षकांना आवडला त्यानंतर यामी गौतमी घराघरात ओळखली जाऊ लागली. त्यानंतर तिने ‘विक्की डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘उरी’, ‘काबिल’, ‘बाला’, ‘अ थर्सडे’ यासारख्या चित्रपटातही तिने काम केलं.