Navjot Singh Sidhu : प्रत्येकाला खळखळवून हसवणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’चे लाखो चाहते आहेत. येथील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना अगदी पोट दुखेपर्यंत हसवतो. घराघरांत पाहिल्या जाणाऱ्या या शोमध्ये तब्बल पाच वर्षांनंतर नवजोत सिंग सिद्धू यांची पुन्हा एन्ट्री झाली आहे. नवज्योत सिंग सिद्धू शोमध्ये आल्याने सेटवर एकच हशा पसरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या शोचा एक टिजर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये नवज्योत सिंग सिद्धू आल्याने संपूर्ण सेटवर मजा मस्ती सुरू आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना पाहून सारेच आश्चर्यचकीत झालेत. इतकंच काय तर कपिल शर्मा सुद्धा त्यांना पाहून एका क्षणासाठी थक्क झाला.

हेही वाचा : भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा गायक; एका गाण्यासाठी आकारतो तब्बल तीन कोटी! अरिजीत सिंह, सोनू निगम जवळपासही नाहीत

व्हिडीओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की, नवज्योत सिंग सिद्धू यांनी या शोमध्ये पुन्हा एकदा आगमन करत थेट अर्चनाच्या खुर्चीचा ताबा मिळवला आहे. अर्चना जेव्हा सेटवर येते तेव्हा नवज्योत सिंग सिद्धू यांना पाहून ती देखील थक्क होते. तसेच कपिलला म्हणते की, सरदार साहेबांना सांग, माझ्या खुर्चीवरून उठा. ते माझ्या खुर्चीवर कब्जा करून बसले आहेत. त्यावर पुन्हा एकदा सर्वजण खळखळून हसू लागतात.

कपिल शर्मा शोमध्ये यावेळी नवज्योत सिंग सिंद्धू यांच्यासह त्यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू आणि क्रिकेटर हरभजन सिंह सुद्धा आलेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या टिझरमध्ये सुनिल ग्रोवरने नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासारखे कपडे परिधान केले आहेत. तसेच खुर्चीवरून सुनिल नवज्योत यांच्याशी मजा मस्करी करताना दिसत आहे. व्हायरल टिझरमध्ये क्रिकेटर हरभजनने देखील नवज्योत यांच्यासाठी एक शेर म्हटला आहे.

अर्चनाच्या खुर्चीवर नवज्योत सिंग सिंद्धूंचा कब्जा?

आता हा व्हिडीओपाहून अर्चनाच्या खुर्चीवर नवज्योत सिंग सिंद्धू कब्जा करणार? असा प्रश्न तुमच्या मनात देखील आला असेल. नवज्योत सिंग सिद्धू द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोमध्ये पाहुणे म्हणून आले आहेत. ते पुन्हा एकदा शोचा भाग होणार की नाही याबद्दल अद्याप तरी कोणतीही ऑफिशीअल माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा : “तुमचं वजन किती?” विचारणाऱ्या चाहत्याला ऐश्वर्या नारकरांनी दिलं भन्नाट उत्तर, म्हणाल्या…

साल २०१३ पासून नवज्योत सिंग सिद्धू कपिल शर्मा शोचे अविभाज्य भाग होते. या शोमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये लाखोंची भर पडली. मात्र पुलवामा हल्ल्यावर त्यांनी एक वक्तव्य केलं त्यामुळे त्यांना शोमधून बाहेर निघावं लागलं. त्यावेळी नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेल्या वक्तव्याने लाखो भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. बॉयकॉट नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह बॉयकॉट कपिल शर्मा शो असे हॅशटॅग नेटकरी त्यावेळी शेअर करत होते.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After five years navjot singh sidhu returns to kapil sharma show archana sing funny reaction teaser video viral on social media rsj