आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला. त्याने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील केले, परंतु बहिष्कारामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली. चित्रपटाला सोशल मीडियावर बॉयकॉट करण्याची मागणी सातत्याने झाली होती. मात्र आता सोशल मीडियावर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे अशी चर्चा आहे.
‘लाल सिंग चड्ढा’ ६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. ठरलेल्या तारखेच्या आधीच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण ‘लाल सिंह चड्ढा’ला ओटीटीवर खूप प्रेम मिळाले. आता सोशल मीडियावर #RediscoveringLSC! हा हॅशटॅग सध्या व्हायरल होत आहे.
“त्याचं दिग्दर्शन…”; ‘वेड’ चित्रपट पाहून सचिन पिळगावकरांनी केलं रितेश देशमुखचं कौतुक
काहींनी लाल सिंग चड्ढा यांना ‘भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक’ म्हणून संबोधले, तर काहींनी त्यांच्या घरीच हा चित्रपट पहिला आहे. तसेच या चित्रपटाला नवा प्रेक्षक वर्ग मिळाला असल्याचे बोलले जात आहे. याआधी ट्वीटवरवरून अनेकजण या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत होते.
आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आमिर खान करीना कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट सुमारे १८० कोटी खर्च करून तयार करण्यात आला होता. या चित्रपटाने थिएटरमध्ये जवळपास ७० कोटींची कमाई केली होती.