करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ या शोचा आठवा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. करणचे चाहते आणि सिनेप्रेमी या शोची फार आतुरतेने वाट बघत असतात. वेगवेगळे बॉलिवूड सेलिब्रिटीज या कार्यक्रमात येऊन चित्रपटसृष्टीतील बरीच गुपितं उलगडतात. याबरोबरच प्रचंड गॉसिपसुद्धा या कार्यक्रमाच्या मंचावर आपल्याला बघायला मिळतं. नुकताच याच्या नव्या सीझनचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला. पहिल्या भागात दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंह यांनी हजेरी लावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या भागाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. जेव्हापासून या चॅट शोच्या आठव्या सीझनची चर्चा सुरू झाली तेव्हापासूनच या नव्या सीझनमध्ये कोणते नवीन सेलिब्रिटीज हजेरी लावणार याबद्दल माहिती समोर येत होती. बऱ्याच बड्याबड्या सेलिब्रिटीजनी या नव्या सीझनमध्ये हजेरी लावण्यास नकार दिल्याचंही समोर आलं. अभिनेता कार्तिक आर्यनपासून शाहरुख खान व करीना कपूरपर्यंत कित्येकांनी या नव्या सीझनमध्ये येण्यास नकार दिला.

आणखी वाचा : ‘त्या’ दिवशी करण जोहर घरी जाऊन ढसाढसा रडलेला; ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर निर्मात्याने सांगितली दुःखद आठवण

अशातच आता सनी देओल या कार्यक्रमात हजेरी लावणार अशी चर्चा सुरू झाली आहे. ‘गदर २’सारखा सुपरहीट चित्रपट दिल्यानंतर सनी देओल आता करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ८’मध्ये हजेरी लावणार आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या रीपोर्टनुसार सनी देओलने त्याच्या एपिसोडचं चित्रीकरणही पूर्ण केलं आहे. अन् हा भाग याच आठवड्यात प्रसारित केला जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. अद्याप निर्मात्यांनी किंवा सनी देओलने याची पुष्टी केलेली नाही.

‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिक व्यवसाय केल्याने सनी देओल सध्या चांगलाच चर्चेत आहे. याबरोबरच सनी आता ‘बॉर्डर २’ व ‘इंडियन २’ या चित्रपटांच्या सिक्वलवरही काम करणार आहे. शिवाय सनी देओल, आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी एकत्र येऊन एका चित्रपटाची निर्मिती करत असल्याचंही समोर आलं आहे ज्यात आमिर व सनी प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. याबरोबरच सनी देओल नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’मध्ये हनुमानाच्या भूमिकेत दिसणार असल्याचीही चर्चा आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After gadar 2 success sunny deol will be part of koffee with karan season 8 avn