ओटीटी प्लॅटफॉर्मवर दररोज कोणतीतरी वेब सीरिज किंवा चित्रपट प्रदर्शित होत असतात. ओटीटीवर प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी वेगवेगळ्या जॉनरचा कंटेंट उपलब्ध आहे. ‘शैतान’पासून ‘हीरामंडी’पर्यंत या आठवड्यात अनेक मोठे चित्रपट व सीरिज ओटीटीवर आले, त्यांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळतेय. पण आता दुसऱ्या आठवड्यात प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन कंटेंट शोधू लागले आहेत. या आठवड्यात कॉमेडी, हॉरर, ॲक्शन आणि रोमान्सचा मिलाफ असलेले अनेक दमदार चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर येणार आहेत. या आठवड्यात विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर काय नवीन पाहता येईल, जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनदेखी सीझन ३

नंदिश संधू, हर्ष छाया यांची ‘अनदेखी ३’ ही सोनी लिव्हवरील सर्वात लोकप्रिय सीरिज आहे. या मालिकेचे पहिले दोन सीझन खूप हिट झाले, आता तिसरा सीझन १० मे रोजी प्रदर्शित होत आहे. ही मालिका हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, मराठी आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत दिव्येंदू भट्टाचार्य, सूर्या शर्मा, हर्ष छाया, आंचल सिंग, अंकुर राठी आणि अभिषेक चौहान यांच्या भूमिका आहेत.

सत्य घटनांवर आधारित ‘हे’ K-Drama ओटीटीवर आहेत उपलब्ध; घरबसल्या पाहता येणार रोमान्स, सस्पेन्स अन् थ्रिलरचा मिलाफ

योद्धा

सिद्धार्थ मल्होत्रा, राशी खन्ना आणि दिशा पटानी यांचा चित्रपट ‘योधा’ २२ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट १५ मेपासून प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

आदुजीविथम– द गोट लाइफ

‘आदुजीविथम – द गोट लाइफ’ हा मल्याळम सर्व्हायव्हल ड्रामा आहे. हा बेंजामिनच्या ‘आदुजीविथम’ या कादंबरीवर आधारित आहे. यात सौदी अरेबियामध्ये मेंढपाळ म्हणून गुलाम बनवलेल्या मल्याळी मजूर नजीबची सत्यकथा दाखविण्यात आली आहे. यात पृथ्वीराज सुकुमारन, जिमी जीन-लुईस आणि केआर गोकुळ, तालिब अल बलुशी, रिक ॲबे, अमाला पॉल आणि शोभा मोहन यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर १० मे २०२४ पासून पाहू शकता.

ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती

मर्डर इन माहिम

आशुतोष राणा व विजय राज फिजियोलॉजिकल क्राइम थ्रिलर सीरिज ‘मर्डर इन माहिम’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या मर्डर मिस्ट्री सीरिजमध्ये शिवानी रघुवंशी व शिवाजी साटमदेखील दिसतील. ही सीरिज 10 मे रोजी जिओ सिनेमावर रिलीज होईल.

श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”

8 एएम मेट्रो

ही एक लव्हस्टोरी असून यात गुलशन देवैया व सैयामी खेर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १० मे रोजी झी ५ व रिलीज होईल.

रत्नम

हा तमिळ अॅक्शनपट या आठवड्यात प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.

ऑल ऑफ अस स्ट्रेंजर्स

हा चित्रपट ८ मेपासून तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.

द फाइनल अटॅक ऑन वेम्ब्ले

फुटबॉलवर आधारित ही सीरिज 8 मे पासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

मॅक्सटन हॉल-द वर्ल्ड बिटविन अस

मोना केस्टनच्या ‘सेव्ह मी’ या सर्वाधिक विक्री झालेल्या कादंबरीवर आधारित ‘मॅक्सटन हॉल’ची कथा लव्ह-हेट रिलेशनशिपवर आधारित आहे. हा प्राइम व्हिडिओवर ९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

डॉक्टर हू

ही एका डॉक्टराची गोष्ट आहे, जो अंतराळात प्रवास करतो. हा चित्रपट ११ मे पासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.

जानकी समसारा

ही कन्नड वेब सीरिज आहे. संयुक्त कुटुंबात राहणाऱ्या जानकी व राघव नावाच्या जोडप्याची गोष्ट यात सांगण्यात आली आहे. ही सीरिज ६ मे रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे.

आवेशम

‘आवेशम’ हा मल्याळम विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा तीन तरुणांभोवती फिरते, जे बंगळुरूला येतात. त्यांचं एक भांडण होतं आणि मग ते एका गँगस्टरशी मैत्री करतात. हा चित्रपट ९ मे रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After shaitaan heeramandi aadujeevitham ratnam all of us strangers murder in mahim undekhi 3 will release on ott hrc