२०१८ साली भारतीय चित्रपटसृष्टीचे मापदंड मोडीत काढणारा ‘तुंबाड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, आणि केवळ माउथ पब्लिसिटीच्या आधाराने या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा हा चित्रपट २०१५ सालीच तयार झाला होता, पण त्यातले स्पेशल इफेक्ट आणि इतर नवीन बदल करण्यासाठी त्यांना पुढची ३ वर्षं लागली. जेव्हा या चित्रपटाची चर्चा झाली तेव्हा बॉलिवूडमधीलही दिग्गज मंडळींनी याची दखल घेत राही बर्वेचं कौतुक केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा चित्रपट सुपरहीट झाल्यानंतर लोकांना याच्या सीक्वलची अपेक्षा होती, पण दिग्दर्शक राही बर्वे यांनी एका मुलाखतीमध्ये याचा पुढील भाग येणार नाही असं स्पष्ट सांगून त्यावर पडदा टाकला. तेव्हापासून राही बर्वे नेमकं काय सरप्राइज घेऊन येणार याकडे प्रेक्षक डोळे लावून बसले. मध्यंतरी राही बर्वे हे ‘मयसभा’ हा चित्रपट घेऊन येणार अशी चर्चा होती, पण त्याबद्दल अजूनही काही अपडेट नाही.

आणखी वाचा : Viral Video: लाल गाऊनमध्ये मलायका अरोराचा बोल्ड लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, “अर्जुनची आई…”

अशातच राही बर्वे प्राइम व्हिडिओसाठी ‘गुलकंद टेल्स’ ही वेबसीरिज करणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. आता ही वेबसीरिज अंतिम टप्प्यात आहे. राही बर्वे यांनी नुकतंच या वेबसीरिजच्या चित्रीकरणाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला. या फोटोसह राही यांनी ही वेबसीरिज कुठे कुठे चित्रित केली गेली आहे याची माहिती दिली आहे. हा फोटो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणली आहे.

राही बर्वे यांनी मध्यंतरी या वेबसीरिजच्या सेटवरील काही फोटो शेअर केले होते, पण अद्याप या सीरिजबद्दल कुठलीही गोष्ट बाहेर आलेली नाही. यामुळेच प्रेक्षक या आगामी वेबसीरिजसाठी उत्सुक आहेत. राही यांच्या फोटोवर लोकांनी टीझर अन् ट्रेलर कधी येणार अशी विचारणा केली आहे. लवकरच याचा टीझर ट्रेलर भेटीला येऊ शकतो अशी राही यांनी यावर प्रतिक्रियाही दिली आहे.

‘तुंबाड’नंतर राही बर्वे यांच्या आगामी कलाकृतीची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. ‘गुलकंद टेल्स’ या वेबसीरिजची निर्मिती ‘द फॅमिलीमॅन’ अन् ‘फर्जी’सारख्या सीरिज देणाऱ्या राज आणि डीके यांनी केली आहे. या वेबसीरिजमध्ये कुणाल खेमू, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, पत्रलेखासारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहे. राही बर्वे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After tumbbad rahi anil barves upcoming webseries gulkanda tales is in buzz avn
Show comments