बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट १८ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. आता दृश्यम चित्रपटाचा सिक्वेल पाहण्यासाठीही प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करत आहेत. ‘दृश्यम २’ चित्रपटाचे शो हाऊसफुल होताना दिसत आहेत.
अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही दमदार कमाई करत आहे. प्रदर्शनाच्या दिवशी या चित्रपटाने १५.३८ कोटींची कमाई केली. ‘दृश्यम २’ हा ‘ब्रह्मास्र’ नंतर पहिल्या दिवशी जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तर पहिल्याच विकेंएण्डला ‘दृश्यम २’ने बॉक्स ऑफिसवर शनिवारी २१.५९ व रविवारी २७.१७ कोटींचा गल्ला जमवला. आतापर्यंत चित्रपटाने ६४.१७ कोटींची कमाई केली आहे.
हेही वाचा >> Video: fifa fever, सचिन तेंडुलकरसह आयुष्मान खुरानाचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल
‘दृश्यम २’ चे शो हाऊसफुल होत असल्याने कित्येक प्रेक्षकांना या चित्रपटासाठी वाट बघावी लागत आहे. लवकरच ‘दृश्यम २’ ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पण यासाठीही प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘दृश्यम २’ चित्रपटाचे मीडिया राइट्स अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मने खरेदी केली आहेत. त्यामुळे हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा >> “मी लग्न करू की नको?” चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं भन्नाट उत्तर, म्हणाली, “करून टाका माझा…”
अजय देवगणसह ‘दृश्यम २’ मध्ये तब्बू, अक्षय खन्ना, श्रीया सरन, इशिता दत्ता या कलाकरांच्या मुख्य भूमिका आहेत. तर मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडकेही या चित्रपटात झळकला आहे. सिद्धार्थने या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.