‘बिग बॉस ओटीटी’चा दुसरा सीझन सध्या चर्चेत आहे. शोचा नवीन आठवडा सुरू झाला आहे. आलिया सिद्दीकी, पलक पुरस्वानी आणि पुनीत सुपरस्टारनंतर अलीकडेच आकांक्षा पुरीलाही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. घराबाहेर पडल्यावर मीडियाशी बोलताना आकांक्षा पुरीने जैद हदीदशी किसिंगनंतर झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. तिने त्या किसिंग प्रकरणाला फक्त एक टास्क म्हटलंय. पण जैदने आकांक्षाला वाईट किसर म्हटलं होतं, त्यावर तिने उत्तर दिलं.
आकांक्षा पुरीला सर्वांसमोर किस करणारा जैद हदीद आहे घटस्फोटित; कोण आहे त्याची पूर्वाश्रमीची पत्नी?
खरं तर, गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस ओटीटी २’ मध्ये अविनाश सचदेवने आकांक्षा पुरीला जैद हदीदला किस करण्याचे टास्क दिले होते आणि अभिनेत्रीने हे टास्क पूर्ण केले होते, पण आकांक्षा आणि जैदच्या किसिंग सीनवर बराच गदारोळ झाला होता. वीकेंड का वारमध्ये सलमान खाननेही या दोघांना खडे बोल सुनावले होते. ‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर पडल्यानंतर आकांक्षा पुरी म्हणाली, “त्या दिवशी मी तीन टास्क केले. जेणेकरून माझी टीम जिंकू शकेल. माझ्यासाठी जैदला किस करणं हे फक्त टास्क होते, त्यादिवशी जैदशिवाय इतरही कोणी असतं तरी मी ते टास्क केलं असतं, कारण मला टास्क जिंकायचे होते. मग ती पूजा भट्ट किंवा सायरस असता तरीही मी किस केलं असतं. मी जे केलं त्याबद्दल मला पश्चाताप नाही.”
पहिल्या डेटवर कधी सेक्स केला आहे का? तमन्ना भाटिया व विजय वर्मा म्हणाले…
आकांक्षाला जैद हदीदच्या कमेंटबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, “हे ऐकून मला धक्का बसला आहे. तो माझ्याबद्दल असं बोलेल अशी मला अपेक्षा नव्हती. म्हणजे तो माझ्यासमोर खोटं वागत होता. मी तर त्याला टास्कचा भाग म्हणून किस केले होते. माझ्या डोक्यात एक गोष्ट स्पष्ट होती टास्क पूर्ण करण्यासाठी मला त्याला ३० सेकंद किस करावे लागणार.”
आकांक्षा पुढे म्हणाली, “जैद किस करताना भावनांमध्ये वाहून गेला. तो मला किस करू लागला. जरी मी तसं करत नव्हते. कारण माझ्या मनात त्याच्याबद्दल कोणतीच भावना नव्हती. यामुळे मी बॅड किसर आहे, असं तो म्हणाला. बरं, तो माझा जोडीदार नाही की मी त्याला किस करेन किंवा मला माझ्या दिग्दर्शकाने माझ्या सहकलाकाराचे किस घेण्यासही सांगितलं नाही. मी फक्त टास्क म्हणून त्याला किस केलं. पण माझ्याबद्दल अशा गोष्टी बोलून तो स्वतःला मुर्ख दाखवत आहे.”