गेल्या आठवड्यात आलिया सिद्दिकी ‘बिग बॉस ओटीटी २’च्या घराबाहेर पडली. त्यानंतर आकांक्षा पुरी हिला कमी मतामुळे घराबाहेर व्हावं लागलं. पण ज्याप्रमाणे बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर घरातील सदस्य आणि सलमान खानबरोबर बोलण्याची शेवटची संधी मिळते, त्याप्रमाणे आकांक्षाला मिळाली नाही. तिला थेट घराबाहेर काढण्यात आलं. ही अपमानास्पद वागणूक असल्याचं आकांक्षा म्हणाली. तसेच सलमान खाननं तिला दुर्लक्ष केलं. साध विचारलंही नाही, असा खुलासा आकांक्षानं केला.
‘इंडियन एक्सप्रेस’बरोबर बोलताना आकांक्षा पुरी म्हणाली की, “शोमध्ये मला पहिल्या दिवसापासून टार्गेट केलं जात असल्याचं समजतं होतं. घरात माझी कोणाशीही मैत्री नव्हती. कुठल्याही ग्रुपमध्ये मी नव्हती. तसेच मी घरात दोन दिवस उशीरा प्रवेश केला. त्यानंतर मी तीन दिवस जेलमध्ये काढले. आणि यामुळे मला माझा खेळ दाखवण्याची संधीच मिळाली नाही. घरात १४ दिवस मला कोणताही बेड मिळाला नव्हता. पण या शिक्षेत वाढ का केली हे समजलंच नाही.”
हेही वाचा – Video: “ते कधीच…,” नितीन गडकरींनी सांगितली शरद पवारांबद्दल खुपणारी गोष्ट
हेही वाचा – सिद्धार्थ जाधव येतोय जॉनी लिवरबरोबर खळखळून हसवायला; ‘अफलातून’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
“जेव्हा घरात गोंधळ किंवा भांडण होत असे तेव्हा मी सगळ्यांना आदरानं बोलवायची. मी ‘आप’ म्हणून हाक मारायची. पण इतरांना वाटलं की, मी चांगली असल्याचा दिखावा करते. एवढंच नाहीतर त्यांना माझं सुंदर दिसणंही खटकत होतं. आता सुंदर दिसणं यात माझी काही चुक आहे का? घरातील सदस्य मला स्वीकारू शकले नाहीत, त्यांना मी नकली वाटू लागले. पण याला मी काहीच करू शकतं नाही.”
शेवटी आकांक्षानं घराबाहेर पडताना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल सांगितलं. आकांक्षा म्हणाली की, “प्रत्येक सदस्याला घरातून बाहेर पडल्यानंतर सलमान खान आणि घरात असलेल्या सदस्यांबरोबर बोलण्याची संधी मिळते. पण ही संधी मला दिली गेली नाही. मला थेट घरातून बाहेर काढण्यात आलं. हे खूप अपमानास्पद होत. यामुळे मला असा प्रश्न पडला की, हे फक्त माझ्याबरोबरच का? वीकेंडच्या वारला तर सलमान खान माझ्याबरोबर बोलणंही टाळतं असे. त्यामुळे मला दुर्लक्ष केल्यासारखं वाटलं. याचा मला खूप त्रास झाला. माझ्या आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा मी सामना केला आहे. पण ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा सामना करणं खूप कठीण होतं. त्यांनी मला कधीच माझा खेळ खेळू दिला नाही.”