अभिनेत्री राखी सावंत ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या विधानांमुळे ती नेहमी चर्चेत असतेच पण त्याचबरोबर तिचे सोशल मिडीयावरील माजेशीर व्हिडीओही तूफान व्हायरल होता असतात. त्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओमध्ये तिचा बॉयफ्रेंड आदिल खानही असतो. आता ही दोघं एक नवी इनिंग सुरू करणार आहेत.

राखी गेले बरेच महिने आदिलबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. आदिल आणि तिच्या नात्यामुळे ती दोघं नेहमी चर्चेत असतात. आदिलच्या प्रेमात बुडलेली राखी आदिलसाठी बऱ्याच आतरंगी गोष्टी करताना दिसते. कधी सगळ्यांसामोर त्याच्यावर फुलांचा वर्षाव करते, तर कधी आदिलची भेट होणार म्हणून स्वतःचा लूक बदलते. नेहमी एकमेकांबरोबर दिसणारे राखी आणि आदिल कधी लग्न करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच त्यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

आणखी वाचा : “माझे वडील जाताना…”; दिवंगत इरफान खान यांच्याबद्दल लेक बाबिलचा खुलासा

राखीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखी आणि आदिल एका हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. या व्हिडीओत राखी म्हणते, “आज आम्ही सेलिब्रेशन करत आहोत. कारण मी आणि आदिल एक खूप चांगली नवीन वेब सिरिज एकत्र करणार आहोत.” राखीसोबतच आदिलही ही आनंदाची बातमी चाहत्यांना देताना दिसतोय.

आदिल आणि राखी चा हा व्हिडीओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर रखीच्या चाहत्यांनी कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे. यापूर्वी राखी आणि आदिल एका म्युझिक व्हिडीओमध्ये दिसले होते. त्यानंतर आता पुनः एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत. आता ही वेब सिरिज कशावर असेल आणि ती कधी प्रदर्शित होईल हे येत्या काही दिवसात समोर येईल.

Story img Loader