यावर्षीची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास ठरली. कारण २५ ऑक्टोबरला दोन बिग बजेट हिंदी तर एक मराठी ऐतिहासिक चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. अक्षय कुमारचा ‘राम सेतु’, अजय देवगणचा ‘थँक गॉड’ तर सुबोध भावेचा ‘हर हर महादेव’ बॉक्स ऑफिसवर दाखल झाले होते. ‘हर हर महादेव’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला मात्र हिंदी चित्रपटांकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली. अक्षयच्या ‘राम सेतु’ने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी उत्तम कामगिरी केली. मात्र त्यानंतर या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही.

‘राम सेतु’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती. प्रदर्शनापूर्वीच अक्षयचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे ‘राम सेतु’ला प्रेक्षकांच्या कितपत प्रतिसाद मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह होतं. आता मात्र हाच चित्रपट प्रेक्षकांना ओटीटीवर बघता येणार आहे.

salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
aitraaz movie seqwel
अक्षय कुमारच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमाचा येणार सिक्वेल, चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होताच निर्मात्यांनी केली घोषणा
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Juhi Chawala
जुही चावला बॉलीवूडमधील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री! चित्रपटांपासून दूर असूनही कसे कमावते पैसे? उत्पन्नाचा स्रोत काय? घ्या जाणून…

आणखी वाचा : ‘पठाण’चं नवं गाणं ‘झुमे जो पठाण’ प्रदर्शनासाठी सज्ज; शाहरुखने पोस्ट शेअर करत सांगितली तारीख, वेळ

अक्षयचा ‘राम सेतु’ हा चित्रपट प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. २३ डिसेंबरपासून हा चित्रपट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून पोस्टर शेअर करत ही माहिती दिली आहे. चित्रपटगृहात या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी अक्षय कुमारच्या या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसाठी लोक उत्सुक आहेत.

‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ सुपरफ्लॉप ठरल्यानंतर ‘राम सेतु’कडून प्रेक्षकांना अपेक्षा होत्या. मात्र चित्रपटाच्या कमाईमध्ये अशीच घसरण होत गेली आणि ‘राम सेतु’सुद्धा बॉक्स ऑफिसवर अपयशीच ठरला. यावर्षी अक्षय कुमारचे बहुतेक करून सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. आता या चित्रपटाला ओटीटीवर कसा प्रतिसाद मिळतो ते येणारी वेळच ठरवेल.