अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला नाही. रिलीजच्या एका आठवड्यातच हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरला आणि प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली. तब्बल ३५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बजेटच्या निम्मीही कमाई करू शकला नाही.
थिएटर्समध्ये फारशी कमाल न करू शकलेला हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तुम्ही हा ॲक्शन-पॅक्ड चित्रपट घरी बसून पाहू शकता. हा चित्रपट नेमक्या कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे, ते जाणून घेऊयात.
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ कधी आणि कुठे प्रदर्शित होणार?
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट ६ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. पण हा चित्रपट कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध असेल, याबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ व्यतिरिक्त या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, मानुषी छिल्लर, अलाया एफ, सोनाक्षी सिन्हा आणि रोनित रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती होते?
‘बडे मियाँ छोटे मियाँ’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन जवळपास ६५ कोटी रुपये होते. हा चित्रपट जवळपास पाच आठवडे थिएटरमध्ये राहिला, पण तरीही त्याला १०० कोटींचा गल्ला जमवता आला नाही. हा चित्रपट हिंदीशिवाय तामिळ-तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तमिळमध्ये एकूण ३५ लाख रुपयांचा व्यवसाय केला, तर तेलुगूमध्ये फक्त २८ लाख रुपयांचा व्यवसाय केला.
कन्नड आणि मल्याळममध्ये तर या चित्रपटाला प्रेक्षकच मिळाले नव्हते. या चित्रपटाचे बजेट ३५० कोटी रुपये होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपले बजेटच्या निम्मीही कमाई करू शकला नाही. त्यामुळे आता ओटीटीवर हा चित्रपट कसा परफॉर्म करेल ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. हा चित्रपट ११ एप्रिल २०२४ रोजी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या ‘मैदान’शी टक्कर झाली होती. ‘मैदान’ चित्रपट प्राइम व्हिडीओवर रिलीज करण्यात आला आहे. आता ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ नेटफ्लिक्सवर येणार आहे.