सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपट सीरिजच्या पहिल्या भागाला उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या हिट किंवा फ्लॉप ठरण्यावरुन बरीच चर्चा झाली, मतभेद समोर आले. या चित्रपटाने जगभरात ४०० कोटीपेक्षा अधिक कमाई केली. चित्रपटातील व्हीएफएक्सची चांगलीच खिल्ली उडवली गेली. मात्र रणबीर आणि आलिया यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. तसेच अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाचेही कौतुक झाले. बॉयकॉट ट्रेंडचा या चित्रपटाला चांगलाच फटका बसला तरी याने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.

हेही वाचा : सलमान खानला डेंग्यूची लागण झाल्यानंतर अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल

अयान मुखर्जी, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यात असलेली मैत्री या चित्रपटामुळे आणखीन घट्ट झाली. रणबीर आणि आलियाच्या प्रत्येक समारंभात अयान हजर असतो, तसेच अयानच्या वाढदिवसाच्या दिवशीही रणबीर आलियाने त्याच्यासाठी एक खास पोस्ट टाकत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ‘ब्रह्मास्त्र’च्या निमित्ताने या तिघांनी एकमेकांबरोबर खूप वेळ घालवला. तसेच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही हे तिघे अनेक शहरांमध्ये फिरले. पण आता रणबीर अयानला कंटाळला असल्याचे त्याने एका व्हिडीओत सांगितले आहे.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या ओटीटी रिलीज बाबत बरीच चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत होती. पुढील आठवड्यात ४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट ‘डिस्ने प्लस हॉटस्टार,वर येत आहे. याचेच प्रमोशन करणारा एक गमतीशीर व्हिडीओ आलियाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडीओत रणबीर कपूर एका व्यक्तीशी फोनवर चिडून बोलताना दिसत आहे. रणबीर म्हणतो, “मी आता अयानबरोबर ‘ब्रह्मास्त्र’चे प्रमोशन करून थकलो आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रचंड गाजला आहे. त्यामुळे आता मला पुन्हा त्याच्या ओटीटी रिलीजचे प्रमोशन करायचे नाहीये. मी आता बाबा होणार असल्याने मला माझ्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा आहे.” अशातच रणबीरला अयानचा फोन येतो आणि रणबीरचा स्वर अचानक बदलतो. तो अयानला म्हणतो, “आपण नक्कीच ‘ब्रह्मास्त्र’चे प्रमोशन केले पाहिजे. मी पुन्हा एकदा प्रमोशन करायला तयार आहे.”

आणखी वाचा : ‘अशी’ साजरी करतेय आलिया भट्ट लग्नानंतरची पहिली दिवाळी, पोस्टने वेधलं लक्ष

हा व्हिडीओ आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा गमतीशीर व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले, “कटू सत्य.” रणबीरचा हा मजेदार व्हिडीओ सगळ्यांनाच वेळ आवडला असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.

Story img Loader