‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ (Breathe: into the shadows) या अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील वेब सीरिजला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यामध्ये अभिषेक बच्चन, नित्या मेनन, अमित साध आणि सैयामी खेर हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये होते. २०२० मध्ये ही सीरिज प्रदर्शित झाली होती. या लोकप्रिय सीरिजद्वारे अभिषेक बच्चनने ओटीटी विश्वामध्ये पदार्पण केले. एकाच वेळी दुहेरी भूमिका केल्याने त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. अभिषेकचे चाहते या सीरिजच्या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने या बहुप्रतिक्षित सिरीजच्या सीझन २ चा टीझर प्रदर्शित केला होता. आता या सीरिजचा ट्रेलरदेखील नुकताच प्रदर्शित केला गेला आहे. ऍक्शन सीक्वेन्सने भरपूर अशा या ट्रेलरमध्ये अभिषेक बच्चनचं पात्र उर्वरित ६ बळी मिळवण्यासाठी परत आलं आहे. कबीर (अमित साध) याचीही भूमिका यात अत्यंत महत्त्वाची आहे. सायकोलॉजिकल थ्रिलरच्या दुसऱ्या सीझनमध्ये अभिषेक बच्चन आणि अमित साधसह नित्या मेनन, सैयामी खेर आणि इवाना कौर पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय नवीन कस्तुरिया या अभिनेत्याची भूमिकाही कथेला वेगळंच वळण देणार असल्याचं टीझरमधून स्पष्ट होत आहे.

आणखी वाचा : Photos : ‘तुंबाड’नंतर राही बर्वे गेली ४ वर्षं करतायत ‘या’ वेबसीरिजवर काम; पडद्यामागचे फोटो पाहून व्हाल अचंबित

ट्रेलर लॉन्च दरम्यान नवीन सीझनबद्दल खुलासा करताना अभिषेक बच्चन म्हणाला, “सीझन १ मध्ये सुरू झालेला पाठलाग या नव्या सीझनमध्ये आणखी रोमांचक वळणं घेणार आहे. प्रेक्षकांनी या नवीन सीझनसाठी २ वर्षे वाट पाहिली आणि आम्ही या सीझनच्या माध्यमातून त्यांना जे दाखवणार आहोत ते पाहून त्यांना नक्की आनंद होईल. सीझन २ च्या शेवटी बरीच रहस्यं उलगडणार आहेत. मला आशा आहे की जगभरातील प्रेक्षकांना हा चित्तथरारक पाठलाग बघायला नक्की आवडेल.”

दिग्दर्शक मयंक शर्मा यांनी अर्शद सय्यद, विक्रम तुली, प्रिया सग्गी आणि अभिजित देशपांडे यांच्यासोबत ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’च्या नवीन सीझनचे सह-लेखन केले आहे. ‘ब्रीद: इनटू द शॅडो सीझन २’ ९ नोव्हेंबर रोजी २४० देशात प्रसारित होणार आहे. अभिषेक बच्चनच्या या नवीन सीरिजसाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.