शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा पठाण हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट २५ जानेवारी रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता याच चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटावर सर्वत्र टीका जरी होत असली तरी या चित्रपटाचे ओटीटी हक्क खूपच मोठ्या किमतीला विकले गेले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा चित्रपट वादात अडकल्यानंतर या चित्रपटाला कोणता ओटीटी प्लॅटफॉर्म खरेदी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण आता यात संदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रदर्शनानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच मार्च महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : “अरे! हा तर…” ‘झुमे जो पठाण’ पाहून नेटकऱ्यांनी शाहरुख खानची केली थेट अभिजीत बिचुकलेशी तुलना, जाणून घ्या कारण

हेही वाचा : “सगळं आहे पण तू नाहीस…” शाहरुख खानला ‘पठाण’मध्ये हवा होता ‘हा’ आघाडीचा अभिनेता, व्यक्त केलं दुःख

गेले अनेक दिवस निर्माते विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सशी या चित्रपटाच्या हक्कांसंदर्भात बोलणे करत होते. पण यात बाजी मारली आहे ती ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ने. या चित्रपटाचे ओटीटी अधिकार ‘ॲमेझॉन प्राईम’ने तब्बल २०० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. त्यामुळे प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाने २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. पण अद्याप या गोष्टीची अधिकृत घोषणा झालेली नाही.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon prime reserved ott rights of pathaan for huge amount rnv