दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा कायमच होत असते. गेल्या काही वर्षात या चित्रपटांनी बॉलिवूडमधील बड्या स्टार्सच्या चित्रपटांनाही मागे मागे टाकले आहे. प्रेक्षक हिंदी चित्रपटांपेक्षा दक्षिणात्य चित्रपट बघण्याला प्राधान्य देत आहेत. सध्या थिएटरमध्ये ‘कांतारा’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन’ या दोन चित्रपटांचा डंका आहे. या दोन्ही चित्रोटांचे प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत. पण आता चित्रपटगृहांनंतर ओटीटीवर त्यांची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा : ‘हॅरी पॉटर’ फेम रॉबी कॉलट्रेन यांना आधीच लागली मृत्यूची चाहूल? म्हणाले होते, “पुढील ५० वर्षांनी मी नसेन पण…”
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘पोन्नियिन सेल्वन’ने मोठी कमाई केली. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडले. तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेला ‘कांतारा’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. या चित्रपटाचे भरभरून कौतुक होत आहे. दोन्ही चित्रपट थिएटरमध्ये यशस्वी कामगिरी करत असल्याने त्यांच्यात स्पर्धा पाहायला मिळत आहे. पण त्यांच्यातली हिच स्पर्धा चित्रपटगृहाच्या बाहेरही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
प्रदर्शनानंतर काहीच दिवसात चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले जातात. तसेच हे दोन चित्रपटही थोड्याच दिवसात ओटीटीवर आणले जाणार आहेत. ‘अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ’ने ‘पोन्नियीन सेल्वन’चे हक्क विकत घेतले आहेत. तसेच ‘कांतारा’ ४ नोव्हेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपटही ‘ॲमेझॉन प्राईम’ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होईल अशी माहिती मिळाली आहे. ‘कांतारा’चे निर्माते ‘अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ’शी या चित्रपटाच्या हक्कांबाबत चर्चा करत आहेत.
पण ४ नोव्हेंबर रोजीच ‘अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ’ ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. जर त्यांनी हे दोन्ही बडे चित्रपट एकाच दिवशी ओटीटीवर प्रदर्शित केले तर तिथेही यांच्यात स्पर्धा पाहायला मिळेल. परंतु अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
आणखी वाचा : ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ऐश्वर्या रायच्या अनुपस्थितीचे कारण सलमान खान ?, चर्चांना उधाण
‘कांतारा’ काल प्रदर्शित झाला. हा एक अॅक्शन-थ्रिलर आहे. यात कांबळा आणि बुटा कोलाच्या पारंपारिक संस्कृतीचा उत्सवावर बेतला आहे. यात ऋषभ दुहेरी भूमिकेत आहे. अनेकांनी हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचे वर्णन केले आहे. तर दुसरीकडे ३० सप्टेंबर रोजी मणी रत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचीही बॉक्स ऑफिसवरची यशस्वी घोडदौड सुरु आहे. या चित्रपटामध्ये चियान विक्रम, ऐश्वर्या राय-बच्चन, कार्थी, त्रिशा कृष्णन, जयम रवी हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.