अयान मुखर्जी लिखित आणि दिग्दर्शित ‘ब्रम्हास्त्र भाग १ शिवा’ हा चित्रपट मागच्या महिन्यामध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. जगभरात या चित्रपटाने ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची कमाई केली. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी सर्वत्र बॉयकॉटचे वारे वाहत होते. या ट्रेंडचा फटका याआधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना बसला होता. ब्रम्हास्त्रमुळे बॉयकॉट बॉलिवूडच्या ट्रेंडचा प्रभाव काहीसा कमी झाला.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी चित्रपटामध्ये प्रमुख व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. ते दोघेही प्रदर्शनापूर्वी प्रमोशन्समध्ये खूप जास्त व्यग्र होते. तेव्हा सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरु होती. काही दिवसांपूर्वी रणबीरचा व्हिडीओ आलियाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओद्वारे तिने ‘ब्रम्हास्त्र’ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली होती. या ओटीटी रिलीजसाठीही रणबीरला प्रमोशन करावे लागत असल्याने तो खूप जास्त कंटाळला आहे असे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.

आणखी वाचा – “लग्न न करता तुला बाळ झालं, तरी…” जया बच्चन यांनी नात नव्याला दिलेला सल्ला चर्चेत

नुकताच हॉटस्टारच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्रम्हास्त्रचा आणखी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. मागच्या व्हिडीओमधला रणबीरचा कंटाळलेला अवतार या व्हिडीओमध्येही पाहायला मिळत आहे. यात तो सुरुवातीला पटापट ‘ब्रम्हास्त्र डिज्नी प्लस हॉटस्टारवर ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे’, असे म्हणतो. कॅमेऱ्याच्या मागे असलेला अयान त्याला ‘सॉरी मी ब्लॉकबस्टर शब्द विसरलो. तू ब्रम्हास्त्रच्या आधी ब्लॉकबस्टर हा शब्द घेऊन एक रिटेक देशील’, असे म्हणतो. त्यानंतर रणबीर पुन्हा रिटेक देतो.

आणखी वाचा – कंगनाने ट्विटरच्या अधिकाऱ्यांबद्दल केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी; म्हणाली, “त्यांच्या सर्वनाशाची…”

अयान पुढे ‘असं नाही रे जरा मजा येईल अशा प्रकारे बोल ना..’, असे म्हणून त्याला अजून एक टेक द्यायला सांगतो. आधीच वैतागलेला रणबीर त्याचं बोलणं ऐकून ‘माझं झालंय आता.. जे काही बोलायचंय ते तू बोल..’ एवढं म्हणतो आणि टीशर्टला लावलेला माईक काढत घाईघाईने निघून जाताना दिसतो. या गमतीदार व्हिडीओला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. त्याच्या चाहत्यांनी व्हिडीओखाली कमेंट करत त्याला ओटीटी रिलीजसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader