२०२० मध्ये कोविडमुळे संपूर्ण जग ठप्प झालं आणि मनोरंजनसृष्टीलाही याचा चांगलाच फटका बसला. याचदरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रचंड सुळसुळाट झाला आणि याच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘असुर’ या वेबसीरिजची तेव्हा चांगलीच चर्चा झाली. सुरुवातीला या सिरिजला तसा थंड प्रतिसाद होता, पण नंतर हळूहळू ही वेबसीरिज प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली.

सायको थ्रिलर या पठडीत मोडणारी अशी कथा तोवर कुणीच पाहिली नव्हती. तेव्हापासून या सिरिजच्या पुढच्या सीझनची चाहते आतुरतेने वाट बघत होते. अर्शद वारसी आणि बरुण सोबती या दोन्ही अभिनेत्यांच्या कामाची प्रचंड प्रशंसा झाली. आता लवकरच या सीरिजचा दूसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता यातील एका अभिनेत्रीने वर्तवली आहे.

Outhouse marathi Movies Acting Movies
सहज अभिनयाची पर्वणी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”
Sharayu Sonawane
Video : ‘पारू’ फेम अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; श्वेता खरात कमेंट करत म्हणाली…
Marathi actress Rupal Nand will appear in Tu Hi Re Maza Mitwa
ती पुन्हा येतेय! अभिजीत आमकर-शर्वरी जोगच्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेत ‘स्टार प्रवाह’चा जुना लोकप्रिय चेहरा झळकणार
zee marathi serial tula japnar ahe first promo pratisha shiwankar in lead role
दिसत नसले तरी असणार आहे…; ‘झी मराठी’वर सुरू होणार नवी थ्रिलर मालिका! प्रमुख भूमिकेतील अभिनेत्री कोण? पाहा पहिली झलक
laxmichya paulanni fame actor dhruva datar
लोकप्रिय अभिनेत्याने सोडली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका! आता ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका, जाणून घ्या…
Rang Maza Vegla fame ashutosh gokhale will see in villain character in Tu Hi Re Maza Mitwa new serial
‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, साकारणार खलनायकाची भूमिका

आणखी वाचा : विश्लेषण : शाहरूख जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत कसा पोहचला? जाणून घ्या त्याचा अभिनेता ते यशस्वी उद्योजक या प्रवासाबद्दल

या वेबसीरिजमध्ये रिद्धी डोग्रा, आणि अनुप्रिया गोएंका या दोघी महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या. यापैकी रिद्धीने ‘बॉलिवूड लाईफ’ या मीडिया पोर्टलशी संवाद साधतान या सीरिजच्या पुढच्या सीझनबद्दल खुलासा केला आहे. ती म्हणाली की. “असुर २ चे प्रोमोज मार्च किंवा एप्रिल महिन्यापर्यंत येतील अशी अपेक्षा चाहते नक्कीच ठेवू शकतात, पण त्यात अजूनही काही बदल झाले तर मात्र हा दूसरा सीझन यायला मे महिना उजाडू शकतो.”

चाहते या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनसाठी चांगलेच उत्सुक आहेत. मध्यंतरी अर्शद वारसीनेसुद्धा याबद्दल भाष्य करताना तो या नव्या सीझनमधील नवीन आव्हानांसाठी प्रचंड उत्सुक असल्याचं स्पष्ट केलं होतं. ‘असुर’चा पहिला सीझन वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री रिद्धी डोग्राच्या या वक्तव्यामुळे या वेबसीरिजच्या चाहत्यांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण झाली आहे.

Story img Loader