Aspirants fame Naveen Kasturia Wedding: मनोरंजनविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. एकापाठोपाठ एक अनेक कलाकार त्यांच्या लग्नाच्या बातम्या देत आहेत. अशातच आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याने लग्नगाठ बांधली आहे. ‘Aspirants’ या गाजलेल्या सीरिजमध्ये आपल्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता नवीन कस्तुरिया लग्नबंधनात अडकला आहे.
३९ वर्षीय नवीन कस्तुरियाने त्याच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. नवीनने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये तो आपल्या पत्नीच्या भांगेत कुंकू भरताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत तो पत्नीचा हात धरून सात फेरे घेताना दिसत आहे. अभिनेत्याने लग्नात पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर त्याच्या वधूने सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
हेही वाचा – ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्रीने जुळ्यांना दिला जन्म, ३ वर्षांपूर्वी नौदल अधिकाऱ्याशी केलंय लग्न
पाहा फोटो –
नवीन कस्तुरियाच्या पत्नीचे नाव शुभांगी शर्मा आहे. नवीनच्या लग्नाला अभिनेत्री हर्षिता गौरने हजेरी लावली होती. तिनेही इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून नवीन व शुभांगीला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नवीनने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते कमेंट्स करून त्याचं व शुभांगीचं अभिनंदन करत आहेत.
हेही वाचा – Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक
नवीन कस्तुरिया हा बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. तो हुमा कुरेशीबरोबर ‘मिथ्या 2’मध्येही झळकला होता. मॉडेलिंग करून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या नवीनने नंतर अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि यश मिळवले.