Kapil Sharma Atlee Kumar : कॉमेडियन कपिल शर्मावर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये त्याने केलेल्या विनोदांमुळे अनेकदा टीका होते. बऱ्याचदा तो एखाद्याच्या दिसण्याबद्दल विनोद करतो, त्यामुळे टीकेचा धनी ठरतो. आता पुन्हा एकदा असंच घडलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक ॲटली कुमारने या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी कपिलने ॲटलीच्या दिसण्यावर विनोद केला; मात्र हा विनोद ॲटली व प्रेक्षकांना फारसा रुचला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या ताज्या एपिसोडने ‘बेबी जॉन’च्या टीमचे वरुण धवन, कीर्ती सुरेश, वामिका गब्बी आणि दिग्दर्शक ॲटली कुमार यांनी हजेरी लावली. या एपिसोडमध्ये कपिलने ॲटलीच्या लूकबद्दल विनोद केला. त्याच्या विनोदावर ॲटलीने टाळ्या वाजवून प्रत्युत्तर दिलं. तसेच दिसणं महत्त्वाचं नाही, असं ॲटली कपिलला म्हणाला. शाहरुख खानच्या ‘जवान’चं दिग्दर्शन ॲटलीने केलं होतं. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरल्यावर ॲटली इंडस्ट्रीतील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक झाला आहे.

हेही वाचा – एसीमुळे बोकड शिंकलं, त्याच्या छातीला बाम लावला अन्…; नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा, म्हणाले, “पुण्यात येऊन…”

कपिल शर्माचा प्रश्न अन् ॲटलीचं स्पष्ट उत्तर

कपिलने ॲटलीला विचारलं, “पण, जेव्हा तू एखाद्या स्टारला पहिल्यांदा भेटायला जातो, तेव्हा ॲटली कुठे आहे? असं ते विचारतात का.” यावर ॲटलीने कपिलला सडेतोड उत्तर दिलं. “तुमचा प्रश्न मला समजला. मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ए.आर. मुरुगदास सरांचा मी खरोखर आभारी आहे, कारण त्यांनी माझ्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांनी स्क्रिप्ट मागितली, पण मी कसा दिसतोय किंवा मी ते करण्यास सक्षम आहे की नाही हे त्यांनी पाहिलं नाही. त्यांना कथा आवडली. त्यामुळे जगानेही लोकांकडे तसंच पाहावं. तुम्ही कसे दिसता, यावरून तुमच्याबद्दल मतं तयार होऊ नये”, असं ॲटली म्हणाला. या एपिसोडमधील क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आता कपिलला लोक त्याच्या या वर्णद्वेषी विनोदासाठी ट्रोल करत आहेत.

झाकीर हुसैन यांचे पूर्ण नाव काय होते, त्यांची पत्नी आणि मुली काय करतात? जाणून घ्या

ॲटलीने घेतली अर्चना पूरन सिंहची बाजू

नेहमीप्रमाणे कपिल शर्माने अर्चना पूरन सिंहला टोले लगावले. त्यावरून ॲटलीने अर्चनाची बाजू घेतली. त्याने अर्चनाला शोची ‘तारणहार’ म्हटलं. तसेच तिची खिल्ली उडवू नये, अशी विनंती ॲटलीने कपिलला केली. कपिलने ॲटलीची तिच्याशी ओळख करून दिली आणि म्हणाला, “तिचे नाव अर्चना पूरन सिंग आहे कारण ती डाकू मोहन सिंगची खूप मोठी चाहती आहे. त्यांच्या टोळीत एक माणूस होता, त्याच्या नावावर तिचं नाव ठेवण्यात आलं आहे.” कपिलच्या या विनोदावर सगळे हसू लागले. पण ॲटली म्हणाला, “असं बोलू नका. माझ्या मते ती या शोमधील एकमेव तारणहार आहे. जेव्हा ती हसते तेव्हा मी हसत असतो, कारण मला काहीच समजत नाही. तिचं हसणं एकप्रकारे माझ्यासाठी संकेत असतात.” यानंतर अर्चना लगेच ॲटलीला म्हणाली, “ठीक आहे ॲटली, तू आणि मी आता एक टीममध्ये आहोत.”

हेही वाचा – नाना पाटेकर गावात राहण्याबद्दल झाले व्यक्त, अमिताभ बच्चन यांनी दिनचर्येबद्दल विचारल्यावर म्हणाले, “माझ्याकडे दोन गाई…”

अ‍ॅटली कुमार आता फक्त दिग्दर्शक नाही, तर निर्मातादेखील झाला आहे. तो वरुण धवनचा आगामी चित्रपट ‘बेबी जॉन’चा सहनिर्माता आहे. ‘बेबी जॉन’ हा त्याच्या सुपरहिट चित्रपट ‘थेरी’चा हिंदी रिमेक आहे. ‘थेरी’मध्ये थलपती विजयची मुख्य भूमिका होती. ‘बेबी जॉन’ या ॲक्शन ड्रामामध्ये वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २५ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atlee reply kapil sharma for trolling his looks asks him to not joke about archana puran singh hrc