बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान त्याचा आज ५७वा वाढदिवस आहे. शाहरुखच्या वाढदिवसाची त्याचे चाहते दरवर्षी आतुरतेने वाट बघत असतात. आजचा त्याचं हा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठीही खास ठरला. ‘पठाण’ या शाहरुखच्या आगामी चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला. तर आता ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जीने शाहरुख खानच्या वाढदिवशी त्याच्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
९ सप्टेंबर,२०२२ रोजी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचा पहिला भाग चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या हिट किंवा फ्लॉप ठरण्यावरुन बरीच चर्चा झाली, अनेक मतभेद समोर आले. या चित्रपटाने जगभरात ४०० कोटीपेक्षा अधिक कमाई केली. चित्रपटातील व्हीएफएक्सची चांगलीच खिल्ली उडवली गेली. मात्र रणबीर आणि आलिया यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. तसेच अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाचेही कौतुक झाले. आता हा चित्रपट परवा ओटीटीवर येत आहे.
आणखी वाचा : शाहरुखला वाढदिसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्री ‘मन्नत’बाहेर चाहत्यांची गर्दी; किंग खान आला आणि…
‘ब्रह्मास्त्र’च्या पहिल्या भागात शाहरुख खानचीही झलक दिसली. या चित्रपटात त्याने एक छोटीशी व्यक्तिरेखा साकारली होती. ही व्यक्तिरेखा म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी सरप्राईज होतं. त्याची ही झलक पाहून त्याचे चाहते खूश झाले होते. कारण २०१८ नंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर दिसला. आता हा चित्रपट ४ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर प्रदर्शित होत आहे. पण त्याआधी शाहरुखच्या वाढदिवसानिमित्तानं अयान मुखर्जीने ब्रह्मास्त्र आणि शाहरुखच्या चाहत्यांना एक गिफ्ट दिलं आहे.
अयानने आज तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर प्रदर्शित होणाऱ्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा सुरुवातीचा १० मिनिटांचा भाग मोफत दाखवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. याचं खास कारण म्हणजे चित्रपटाच्या या पहिल्या १० मिनिटातच शाहरुखची या चित्रपटातील व्यक्तिरेखा समोर येते. अयानने पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ”’डिस्ने प्लस हॉटस्टार’वर आजपासून सर्वांसाठी ‘ब्रह्मास्त्र’चा सुरुवातीच्या १० मिनिटांचा भाग मोफत..” अयानच्या या निर्णयावर त्याच्या चाहत्यांनी कमेंट्स करत आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा : Video : “आता खूप झालं…” अयान मुखर्जीवर वैतागला रणबीर कपूर, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान शाहरुख खानाच्या आगामी चित्रपटांची यादीही मोठी आहे. तो पुढील वर्षी ‘जवान’, ‘पठाण’, ‘डंकी’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुखबरोबर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. तर त्याच्या अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटात विजय सेतुपती आणि नयनतारा हे आघाडीचे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर शाहरूख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करणार आहेत. या चित्रपटात त्याच्याबरोबर तापसी पन्नू, बोमन इराणी हे महत्वपूर्ण भूमिका सकारणार आहेत.