आयुष्मान खुराना हा सातत्याने करत असणाऱ्या त्याच्या वेगवेगळ्या प्रयोगांसाठी ओळखला जातो. ‘विकी डोनर’, ‘अंधाधून’, ‘दम लगाके हैशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आर्टिकल १५’ अशा वेगवेगळ्या चित्रपटातून आयुष्मानने स्वतःला एक उत्तम अभिनेता म्हणून सिद्ध केलं आहे. आता पुन्हा आयुष्मान असाच एक वेगळा चित्रपट घेऊन आला आहे, त्याचं नाव आहे ‘डॉक्टर जी.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : आयुष्यात असं काहीतरी…, माधुरी दीक्षितकडून मिळालेल्या अमूल्य पोचपावतीनंतर अमृताची भावनिक पोस्ट

आयुष्मानचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आयुष्मानचे चाहते आणि सगळेच चित्रपटप्रेमी या नवीन चित्रपटासाठी अतिशय उत्सुक होते. नेहमीप्रमाणेच आयुष्मान काहीतरी वेगळं कथानक मांडेल अशी सगळ्यांना अपेक्षा होती. आयुष्मानही गेली अनेक दिवस या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत होता. तसेच हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांनी पाहवा यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटाच्या तिकिटांच्या दरातही कपात केली होती. परंतु या चित्रपटाला तितकासा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये.

चित्रपटगृहात अजूनही या चित्रपटाचे शो सुरु असताना आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. निर्माते हा चित्रपट लवकरच ‘नेटफ्लिक्स’वर घेऊन येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अद्याप या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण या चित्रपटाला थिएटरमध्ये जितका प्रतिसाद मिळत आहे, त्यापेक्षा अनेक पटीने जास्त प्रतिसाद या चित्रपटाला ओटीटीवर मिळू शकतो असे बोलले जात आहे.

हेही वाचा : चित्रपटांना मिळणाऱ्या अपयशांमुळे आयुष्मान खुरानाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आयुष्मान खुरानाच्या या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ९.०९ कोटींची कमाई केली आहे. ‘डॉक्टर जी’ या चित्रपटात आयुष्मान एका स्त्रीरोगतज्ञाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासह रकुल प्रीत सिंग, शैफाली शहा आणि शीबा चड्ढा असे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून आयुष्यमानने ‘उद्य गुप्ता’ नावाच्या स्त्रीरोगतज्ञाची (Gynecologist) व्यथा मिश्कीलपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushman khuranna starrre doctor g film will be release on netflix rnv