वरुण धवनचा (Varun Dhawan) ख्रिसमस २०२४ ला प्रदर्शित झालेला चित्रपट ‘बेबी जॉन’ ओटीटीवर कधी रिलीज होणार याची सोशल मीडियावर चर्चा होती. मात्र मध्यंतरी या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्म मिळत नसल्याच्या बातम्या आल्या. या चर्चांवर आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, या सगळ्या बातम्या निराधार आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्म मिळाला आहे.

‘बेबी जॉन’चा ओटीटी प्रीमियर फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला होणार आहे. त्यामुळे ज्यांना हा सिनेमा चित्रपटगृहात पाहता आला नाही, त्यांना आता घरी बसून हा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे, पण यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

हेही वाचा…या आठवड्यात OTT वर रिलीज होणाऱ्या कलाकृतींची यादी, वाचा…

‘न्युज १८’ ने दिलेल्या वृत्तानुसार ‘बेबी जॉन’च्या निर्मात्यांनी या चित्रपटाचे ओटीटीचे हक्क ‘प्राईम व्हिडीओ’कडे आहेत असे सांगितले आहे. लवकरच हा सिनेमा ओटीटी माध्यमावर पाहता येणार आहे. ‘बेबी जॉन’ हा विजय थलापतीच्या ‘थेरी’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. कालीस यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट अ‍ॅटली यांनी प्रस्तुत केला आहे. मुलींवर होणारे अत्याचार आणि त्यांची होणारी तस्करी यावर हा सिनेमा मुख्य प्रकाश टाकतो. यात वरूण धवन बरोबर कीर्ती सुरेश, वामिका गब्बी आणि राजपाल यादव यांच्या मुख्य भूमिका आहेत.

हेही वाचा…Pataal Lok 2 Trailer: जबरदस्त गूढ, अ‍ॅक्शन आणि ‘ती’ तारीख…, ‘पाताल लोक २’ चा ट्रेलर प्रदर्शित

‘बेबी जॉन’ने बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी केली नाही. रिलीजच्या १६ व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत ५ टक्के घट झाली. १६ व्या दिवशी चित्रपटाने फक्त १९ लाखांची कमाई केली, तर १५ व्या दिवशी २० लाखांची कमाई केली होती. आतापर्यंत चित्रपटाने एकूण ३९.२८ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट १८० कोटी आहे.

Story img Loader