OTT release this week: ओटीटीमुळे घरबसल्या जगभरातील सिनेमे, वेब सीरिज पाहता येतात. तुम्ही कोणत्याही भाषेतील कलाकृती तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवर पाहू शकता. आता तर थिएटरमध्ये रिलीज झालेले चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित करण्याची परंपरा सुरू झाली आहे. असेच काही चित्रपट या आठवड्यात ओटीटीवर रिलीज झाले आहेत. तुम्ही या वीकेंडला ओटीटीवर काय बघायचं, असा विचार करत असाल तर ही यादी नक्की पाहा.

बॅड न्यूज

Bad News on Prime Video: विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बॅड न्यूज’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. १९ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले होते. चित्रपटाची निर्मिती अमृतपाल सिंग बिंद्रा, अपूर्व मेहता आणि करण जोहर यांनी केली होती. यामध्ये नेहा धुपिया, अनन्या पांडे, नेहा शर्मा यांचे कॅमिओ आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७६.७ कोटी रुपयांची कमाई केली होती.

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lagnanantar Hoilach Prem New Promo
लग्नानंतर होईलच प्रेम : ‘या’ तामिळ मालिकेचा रिमेक, मृणालचं कमबॅक अन्…; पाहा जबरदस्त नवीन प्रोमो
ankita prabhu walavalkar Pushpa 2 review
“प्लीज, तुमचे पैसा वाया घालवू नका”, कोकण हार्टेड गर्लचे ‘पुष्पा 2’ बद्दल स्पष्ट मत; म्हणाली, “जे चित्रपट…”

सेक्टर 36


Sector 36 on Netflix: विक्रांत मॅसी आणि दीपक डोबरियाल हे दोघे या क्राईम थ्रिलरमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. यात दोघांचाही यापूर्वी कधीच न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. हा चित्रपट आज १३ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. आदित्य निंबाळकरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे.

Video: “धक्काबुक्की केली, फोन हिसकावला, गैरवर्तन केले”; लालबागचा राजाच्या दर्शनाला गेल्यावर अभिनेत्रीला आला वाईट अनुभव

खऱ्या घटनांनी प्रेरित या चित्रपटात झोपडपट्टीतून अनेक मुलं बेपत्ता होतात, त्याचा शोध घेताना एक स्थानिक पोलीस अधिकारी धक्कादायक सत्यापर्यंत पोहोचते, असं दाखवण्यात आलं आहे. याची निर्मिती दिनेश विजान यांच्या मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओने केली आहे.

बर्लिन

Berlin on OTT: अपारशक्ती खुराना आणि इश्वाक सिंग यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘बर्लिन’ चित्रपट आज (१३ सप्टेंबर रोजी) झी 5 वर प्रदर्शित झाला. या स्पाय थ्रिलर सिनेमाचे दिग्दर्शन अतुल सभरवालने केले आहे. १९९० च्या काळातील दिल्लीतील अधिकारी परदेशी गुप्तहेर असल्याच्या संशयावरून एका मूकबधिर तरुणाला (इश्वाक) अटक करतात, अशी चित्रपटाची कथा आहे. यात राहुल बोस, अनुप्रिया गोएंका, कबीर बेदी हे कलाकारही आहेत.

रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”

मिस्टर बच्चन

Mr Bachchan on OTT: रवी तेजा आणि भाग्यश्री बोरसे यांचा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. एक महिन्यापेक्षा कमी काळातच हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट १२ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाचे दिग्दर्शन हरीश शंकर यांनी केले आहे. ‘मिस्टर बच्चन’ हा २०१८ मधील हिंदी चित्रपट ‘रेड’चा रिमेक आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर फक्त १४.१९ कोटींची कमाई केली.

आर्याने निक्कीच्या थेट कानाखाली वाजवली! दोघींमध्ये जोरदार वाद; ‘बिग बॉस’ देणार शिक्षा; म्हणाले, “हे अतिशय निंदनीय…”

एमिली इन पॅरिस 4 भाग 2

नेटफ्लिक्स शो ‘एमिली इन पॅरिस’ 4 चा दुसरा भाग आला आहे. नेटफ्लिक्सवरील हा शो खूपच लोकप्रिय आहे. दुसर्या भागात वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आव्हानं पेलणाऱ्या एमिलीची कहाणी दाखवण्यात येणार आहे. चौथ्या सीझनचा दुसरा भाग गुरुवारी (१२ सप्टेंबर रोजी) प्रदर्शित झाला.

Story img Loader