Best Horror Movies of 2024 on OTT: ‘मुंज्या’, ‘स्त्री 2’ आणि ‘भूल भुलैया 3’ असे अनेक भयपट यंदा प्रदर्शित झाले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. काही भयपट तर ओटीटीवरही सुपरहिट ठरले. तुम्हाला भयपट पाहायला आवडत असतील, तर २०२४ मधील काही गाजलेले चित्रपट तुम्ही घरबसल्या पाहू शकता. या यादीत सोनाक्षी सिन्हाचा ‘काकुडा’ ते तमन्ना भाटियाच्या ‘अरनमनई 4’चा समावेश आहे.
काकुडा
Kakuda on OTT: ‘काकुडा’ चित्रपट या वर्षी जुलैमध्ये झी5 वर प्रदर्शित झाला होता. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख यांच्यासह अनेक स्टार्स होते. एका गावात ‘काकुडा’ नावाच्या भूताची भीती असते. दर मंगळवारी रात्री ८ वाजता ‘काकुडा’ भूत येते, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
हेही वाचा – ‘टाइम ट्रॅव्हल’वर आधारित चित्रपट पाहायला आवडतात? OTT वरील ‘हे’ सिनेमे पाहून डोकं चक्रावेल
अरनमनई 4
Aranmanai 4 on OTT: ‘अरनमनई ४’ हा २०२४ मध्ये आलेला तमिळ भाषेतील हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन सुंदर सी. यांनी केले होते. या चित्रपटात तमन्ना भाटिया, राशी खन्ना, संतोष प्रताप, रामचंद्र राजू, कोवई सरला, योगी बाबू यांच्यासह अनेक कलाकार आहेत.हा चित्रपट अरनमनई या चित्रपटाचा चौथा भाग आहे. हा चित्रपट खूप गाजला होता. चित्रपटाने चांगली कमाई केली होती. तुम्ही जिओ सिनेमावर हा चित्रपट पाहू शकता.
ब्लडी इश्क
Bloody Ishq on OTT: ‘ब्लडी इश्क’ हा चित्रपटही याच वर्षी हॉटस्टारवर रिलीज झाला होता. यात अविका गौर मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट एका महिलेभोवती फिरतो जी तिच्या नवीन घरात अलौकिक गोष्टी अनुभवते. लोकांना हा हॉरर चित्रपट खूप आवडला होता. हा तुम्ही घसबसल्या पाहू शकता.
टॅरो
Tarot on OTT: ‘टॅरो’ ही सात मित्रांची कथा आहे. या सातपैकी हेली आणि ग्रँट या दोघांचे ब्रेकअप होते. त्यानंतर बाकीचे मित्र सगळ्यांचे मूड चांगले व्हावे यासाठी ॲलिसच्या वाढदिवसाची पार्टी करतात. तिथे ते टॅरो कार्ड वाचतात. त्यानंतर चित्रपटात जे घडतं, ते पाहून तुम्ही हादरून जाल. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.