तुम्ही ओटीटीवर रोमँटिक, अॅक्शन व थ्रिलर चित्रपट पाहून कंटाळले असाल व काहीतरी नवं पाहायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही हॉरर चित्रपट व वेब सीरिज पाहू शकता. ओटीटीवर अशा अनेक सीरिज व चित्रपट आहेत, जे पाहून तुम्हाला भीती वाटेल. यातील काही कलाकृती तर अशा आहेत ज्या तुम्ही एकटे असाल तर पाहूच शकणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे चित्रपट तुम्ही तुमच्या मित्रांसोबत घरी बसून पाहू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही हॉलीवूड व बॉलीवूड भयपटांबद्दल सांगणार आहोत. यातील काही सिनेमे सत्य घटनांवर आधारित आहेत.

हेरेडिटेरी

हा चित्रपट ॲनी नावाच्या मुलीची कथा सांगतो. मुलीच्या आईचं निधन होतं. कुटुंब दुःखातून सावरत असताना अचानक ॲनीच्या आईशी संबंधित काही रहस्ये समोर येऊ लागतात. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

चित्रपटात चमकीला यांच्या जातीचा वारंवार उल्लेख, इम्तियाज अली म्हणाले, “त्यामुळेच त्यांनी आपला जीव गमावला, कारण…”

रात

राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात एक कुटुंब नवीन घरात शिफ्ट होतं आणि मग त्यांच्याबरोबर विचित्र घटना घडू लगतात. या चित्रपटात सर्वाधिक वाईट परिणाम मिनी नावाच्या मुलीवर होतात. यात रेवतीने मिनीची भूमिका केली आहे. ‘रात’ सिनेमा तुम्ही झी 5 वर पाहू शकता.

वेरोनिका

हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे, जो खूपच भीतीदायक आहे. तुम्ही तो नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”

द रिच्युअल

हा चित्रपट नॉर्स मायथोलॉजीवर आधारित आहे, तुम्हाला हा नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

द अॅमिटिविल हॉरर

हा एका खऱ्या सुपरनॅचरल गुन्ह्यावर आधारित चित्रपट आहे. ही घटना न्यूयॉर्क येथील लाँग आयलंडमधील घरात घडली होती. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

गेट आउट

तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडीओ व नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या चित्रपटात लग्न करू इच्छिणाऱ्या एका जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे. मुलीचं असामान्य कुटुंब आणि त्यातील विविध पैलू या चित्रपटात पाहायला मिळतात.

द इन्व्हिटेशन

या चित्रपटातील भीतीदायक दृश्ये पाहून तुम्ही घाबरून जाल. ‘द इन्व्हिटेशन’ चित्रपटाने अमेरिका व कॅनडात २५.१ मिलियन डॉलर व इतर ठिकाणी १२.९ मिलियन डॉलर्सची कमाई केली होती. जगभरात या सिनेमाने एकूण ३८ मिलियन कमावले होते. या चित्रपटाचं बजेट फक्त १० मिलियन डॉलर्स होतं. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.

२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…

घोल

नेटफ्लिक्सची ही वेब सिरीज लष्कराने पकडलेल्या एका व्यक्तीची कथा सांगते. यात कैद्यासोबत घडणाऱ्या भयावह घटना दाखविण्यात आल्या आहेत.

परछाई

झी 5 च्या या सीरिजमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या १२ गोष्टी पाहायला मिळतील. या १२ कथा इतक्या भीतीदायक आहे की तुम्ही त्या एकटे पाहू शकणार नाहीत.

अवघ्या २० कोटींचं बजेट अन् कमावले २२५ कोटी, एकही अभिनेत्री नसलेला ‘हा’ सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित

भ्रम

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिनची ‘भ्रम’ ही सीरिज ZEE5 वर आहे. ही सीरिज इतकी भीतीदायक आहे की तुम्ही एकटे ती पाहू शकणार नाही.

ऑर्फन

‘ऑर्फन’ हा २००९ साली आलेला एक सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best horror movies on ott hollywood bollywood veronica orphan ghol the ritual bhram all list hrc