तुम्हाला जर सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील तर ओटीटीवर एक सुपरहिट सिनेमा उपलब्ध आहे. तुम्ही अजून हा सिनमा पाहिला नसेल तर नक्की पहा. तुम्ही दाक्षिणात्य सिनेमांचे चाहते असाल तर हा चित्रपट तुमच्या वॉचलिस्टमध्ये असणं गरजेचं आहे. हा एक थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये ऑफिसच्या एमडीच्या रहस्यमय मृत्यूची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचं फक्त प्रेक्षकांनीच नव्हे तर समीक्षकांनीही खूप कौतुक केलं होतं. हा चित्रपट नेमका कोणता आहे आणि तो तुम्हाला कुठे पाहता येईल ते जाणून घेऊयात.

मागील काही वर्षांपासून मल्याळम चित्रपट इतर राज्यांमधील प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरले आहे. मल्याळम इंडस्ट्रीने प्रेक्षकांना असे अनेक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट दिले आहेत. आज आम्ही तुम्हाला ज्या चित्रपटाबद्दल सांगतोय तो चित्रपट म्हणजे मल्याळम चित्रपट ‘गोलम’ होय. ७ जून २०२४ रोजी ‘गोलम’ (Golam) मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने थिएटरमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. थिएटरमध्ये चांगलं कलेक्शन करणाऱ्या या सिनेमाला ओटीटीवरही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.

‘गोलम’ची कथा काय आहे?

‘गोलम’ एक मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे, ज्यामध्ये ऑफिसच्या एमडीचा खून होतो आणि त्याचा मृतदेह त्याच्याच ऑफिसमध्ये सापडतो. ऑफिसमध्ये जेवढे लोक असतात त्या सर्वांची पोलीस चौकशी करतात. सुरुवातीला हा अपघात असल्याचं दिसत असलं तरी तपासानंतर ही पूर्वनियोजित हत्या असल्याचं उघड होतं. एक खून आणि १५ जण संशयाच्या भोवऱ्यात असतात. अखेर खून कोणी केलाय ते चौकशीअंती समोर येतं. २ तासांच्या या सिनेमाचा सस्पेन्स पाहून तुमचं डोकं चक्रावेल.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायचा ‘गोलम’?

Golam on OTT: ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे जगभरातील चित्रपट आता तुम्ही तुमच्या फोन व लॅपटॉपवर पाहू शकता. जर तुम्हाला घरबसल्या हा मल्याळम चित्रपट गोलम पाहायचा असेल तर तुम्ही तो ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

‘गोलम’ चित्रपटाचे दिग्दर्शन समजादने केले आहे, तर कथा प्रवीण विश्वनाथ समजादने लिहिली आहे. रंजीत सजीव, शीतल जोसेफ, चिून चांदणी नायर, दिलीश पोथन, अला एस नयना, कार्तिक शंकर आणि सनी वेन या कलाकारांनी गोलममध्ये दमदार अभिनय केला आहे.

Story img Loader